Join us
Daily Top 2Weekly Top 5

या कारणामुळे सुशील आणि सत्याच्या लग्नाबद्दल ही अभिनेत्री आहे उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 14:25 IST

'इक्यावन'मध्ये लवकरच ऑनस्क्रीन लग्न पाहायला मिळणार आहे.या शोमधील नायक नायिका सुशील प्राची टेहलान आणि सत्या नमिष तनेजा लवकरच विवाहबंधनात ...

'इक्यावन'मध्ये लवकरच ऑनस्क्रीन लग्न पाहायला मिळणार आहे.या शोमधील नायक नायिका सुशील प्राची टेहलान आणि सत्या नमिष तनेजा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहते.अभिनेत्री कविता वैद या मालिकेत लीला सत्याची आजीची भूमिका करत असून ह्या दोघांच्या लग्नाबद्दल खूप उत्साही असल्याचे पाहायला मिळत आहे.कविताजी मला आणि नमिषला ऑफस्क्रीन खूप जवळच्या असून सुशील आणि सत्याने या शोमध्ये लग्न करावे असे त्यांचे कायमच म्हणणे होते.त्यांनी मला लग्नाच्या पोशाखात तयारही व्हायला सांगितले. कविताजी आमच्या लग्नाबद्दल अतिशय उत्साहात आहेत.”असे प्राची टेहलान म्हणाली.सत्या लीलाला सांगतो की हे लग्न फक्त त्याच्या सूडाच्या योजनेचा एक भाग आहे आणि ते ऐकून लीला तयार होते ह्या गोष्टीवर हा शो सध्या लक्ष केंद्रित करत आहे.मग ती लग्नानंतर सुशीलचे आयुष्य संकटात टाकण्याचे ठरवते.Also Read:‘ऑनस्क्रीन’ आजी आणि नातवाची ‘रिअल’ केमिस्ट्रीमालिकेतील कलाकारांमध्ये काम करता करता एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. सेटवरच विविध सणांचे सेलिब्रेशन आणि वाढदिवस साजरे होतात. परिणामी मालिकेतील या कलाकारांमध्ये प्रेमाचे आणि आपुलकीचे बंध निर्माण होतात. असंच काहीसं नातं छोट्या पडद्यावरील इक्यावन मालिकेतील कलाकारांमध्ये पाहायला मिळते. यापैकी या मालिकेतील आजी आणि नातवाचे नाते अनोखे असल्याचे पाहायला मिळते. या मालिकेत आजी लीलाची भूमिका अभिनेत्री कविता वैद्य साकारत आहेत. तर त्यांच्या नातवाच्या म्हणजेच सत्याच्या भूमिकेत नमिष तनेजा पाहायला मिळतो आहे.नमिष तनेजासोनत कविता वैद यांची केमिस्ट्री सध्या रसिकांना चांगलीच भावते आहे. या दोघांचे ऑनस्क्रीन आजी आणि नातवाचं नातं रसिकांना भावतं आहे.दोघांमधील नातं हे रिअल आजी आणि नातवासारखंच आहे. इक्यावन या मालिकेत दोघंही रसिकांना भावतायत. याआधीही कविता वैद्य आणि नमिष तनेजा यांनी एकत्र काम केलं आहे. पुन्हा एकदा एकत्र काम करताना दोघंही आनंदी आहेत. इक्यावनच्या सेटवर एक कुटुंब मिळाल्याची भावना कविता वैद्य यांनी व्यक्त केली आहे.