Join us

रसिका सुनीलचा हा फोटो पाहून खतरों के खिलाडीमध्ये जाण्याचा सल्ला देतायेत तिचे फॅन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 16:26 IST

रसिकाने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे.

ठळक मुद्देहा फोटो पाहून तुला खतरों के खिलाडी या कार्यक्रमात पाहायला आवडेल असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

अभिनेत्री रसिका सुनीलने छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. मालिकेने निरोप घेतला असला तरी रसिका सुनीलने प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. रसिका सोशल मीडियावर सक्रिय असून ती त्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तिच्या खाजगी आणि प्रोफेशनल लाइफबद्दल अपडेट देत असते. ती सध्या लॉस अँजेलिसमध्ये आहे आणि ती पायलट झाली आहे.

रसिकाने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे. हा फोटो पाहून तुला खतरों के खिलाडी या कार्यक्रमात पाहायला आवडेल असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत रसिकाने आदित्य बिलागी याला डेट करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तिने आदित्यसोबतचा फोटो आणि व्हिडीओ शेअर करून त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते. तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले होते की, हो आम्ही एकमेकांना डेट करतो आहे.

टॅग्स :रसिका सुनिल