Join us  

आपने तो बिल्कुल मूर्च्छित कर दिया...!  ‘लक्ष्मण’ सुनील लहरींच्या ‘या’ फोटोवर चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 2:00 PM

सुनील लहरी यांच्या एका फोटोची जोरदार चर्चा आहे. होय, बाथरूमधील त्यांच्या या फोटोने त्यांच्या चाहतांना अक्षरश: भुरळ घातली आहे

ठळक मुद्दे 1980 साली द नक्सेलाइटस या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी  फिर आएगी बरसात या चित्रपटात काम केले.

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’  (Ramayan) मालिकेमध्ये ‘लक्ष्मण’ (Lakshman) ही भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी (Sunil Lahri) त्या काळात प्रचंड लोकप्रिय होते. आजही तितकेच लोकप्रिय आहेत. तूर्तास काय तर सुनील लहरी यांच्या एका फोटोची जोरदार चर्चा आहे. होय, बाथरूमधील त्यांच्या या फोटोने त्यांच्या चाहतांना अक्षरश: भुरळ घातली आहे. सध्या हा फोटो तुफान व्हायरल होतोय. अनेक युजर्सनी यावर मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.

सुनील लहरी यांनी नुकताच एक बाथरूममधील फोटो शेअर केला आहे. आंघोळीनंतर लगेच काढलेला हा फोटो शेअर करत सुनील यांनी एक मोलाचा सल्लाही दिला. ‘स्रान तुमचा सर्व थकवा दूर करतो. आपल्या शरीरात सुमारे 60 टक्के पाणी आहे. पाणी हेच जीवन आहे. पाणी वाचवा, जीवन वाचवा,’ असा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे.

या फोटोवर चाहत्यांनी दिलेल्या कमेंट्स वाचण्यासारख्या आहेत. ‘हाय सर, क्या बात की. बिल्कुल मूर्च्छित ही कर दिया,’ असे एका चाहत्याने लिहिले. ‘बोले तो एकदम झक्कास फोटू सर,’ अशी कमेंट एका चाहत्याने केली. क्या पिक्चर है, आपने तो हम अपने मोहमाया के जाल में फसा दिया, अशी कमेंट अन्य एका चाहत्याने केली.याआधी सुनील लहरी भगवान शिवजींच्या मूर्तीसमोरचा एक फोटो शेअर केला होता. यात ते शिवजींच्या मूर्तीला चरणस्पर्श करताना दिसले होते. पण यावेळी त्यांच्या पायातील जोडे पाहून लोकांनी त्यांना ट्रोल केले होते.

सुनील लहरी यांना अभिनयाची आवड होती. शाळेत असताना ते नाटकात भाग घ्यायचे. भोपाळमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते मुंबईत आले. 1980 साली द नक्सेलाइटस या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी  फिर आएगी बरसात या चित्रपटात काम केले. मात्र मोठ्या पडद्यावर त्यांना फारसे यश मिळाले नाही. 1987 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या रामायण मालिकेतून त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली.

टॅग्स :रामायण