Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळा अभिनेता दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर, वडील देखील होते प्रसिद्ध अभिनेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 10:56 IST

लग्नासाठी मालिकेतून त्याने काही काळासाठी ब्रेक घेतलेला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहतायेत. मागील काही दिवसांपासून मराठी कलाविश्वातील कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळाली. अभिनेता रणजित जोगने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत रणजित प्रमुख भूमिका साकारत आहे. लग्नासाठी मालिकेतून त्याने काही काळासाठी ब्रेक घेतलेला आहे. रणजितच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रणजित जोगने अभिनेत्री प्रणाली धुमाळशी सातफेरे घेतले आहे. अभिनेता अमित भानुशाली याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. मोजक्या मित्र-मंडळीच्या उपस्थित हा विवाह सोहळा पार पडला. रणजितच्या लग्नाची बातमी समजताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय.  रणजितचे पहिलं लग्नं संयुक्ता सोबत झाले होते. मात्र लग्नानंतर काही वर्षातच त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री प्रणाली धुमाळ सोबत रणजितचे हे दुसरे लग्न आहे.

रणजितचे वडील संजय जोग हे मराठी कलाविश्वात प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी रामायण मालिकेत भरतची भूमिका साकरली होती. संजय जोग यांचे वडील मुकूंद जोग आणि आजोबा नाना जोग यांनी दोघांनीही मराठी रंगभूमीला आपले योगदान दिले आहे. संजय जोग यांचे अवघ्या चाळीशीत निधन झाले. रणजित गेल्या १५ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असून त्याने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. जिंदगी तेरी मेरी कहानी या हिंदी तर कुंडली, दुर्वा, कुलवधू, ओळख, गर्ल्स हॉस्टेल यांसारख्या मालिकांमध्ये तो झळकला आहे. त्याने मालिकांसोबतच लपून छपून, आव्हान, जेता, सून माझी भाग्याची यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

टॅग्स :रामायणटिव्ही कलाकार