Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rakhi Sawant Video : 'मोदीजी आप जुग जुग जियो', राखी सावंतने मानले पंतप्रधानांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 09:14 IST

ड्रामा क्वीन राखी सावंतचा ड्रामा सतत सुरुच आहे.

Rakhi Sawant : ड्रामा क्वीन राखी सावंतचा ड्रामा सतत सुरुच आहे. सध्या तिचा पती आदिल दुर्रानी तुरुंगात आहे. तो तुरुंगातून बाहेर आल्यावर चौथे लग्न करु शकतो, असं राखीचं म्हणणं आहे. मात्र मी त्याला घटस्फोट देऊ देणार नाही हे राखीने स्पष्ट केले आहे. याशिवाय तिने पंतप्रधान मोदींचेही आभार मानले आहेत. 

मोदीजी आप जुग जुग जियो 

पापाराझींशी संवाद साधताना राखी म्हणाल, 'आदिल मुस्लिम आहे म्हणजे तो मला तीन तलाक बोलेल असा अर्थ होत नाही. तो किती पण म्हणेल पण मी मुसलमान आहे मी ४ लग्न करेल,  मुस्लिम लोकही याला संमती देत नाहीत. मी मोदीजींचे आभार मानते मोदीजी आप जुग जुग जियो, तिहेरी तलाकच्या कायद्यासाठी सगळ्या महिला तुम्हाला  सलाम करतील. मला वाटलंही नव्हतं एक दिवस हा कायदा माझ्या उपयोगी येईल.'

राखीने ६ फेब्रुवारी रोजीच आदिलविरोधात एफआयआर दाखल केली होती. फसवणूक आणि मारहाण केल्याप्रकरणी आदिलला पोलिसांनी अटक केली. राखी करत असलेले आरोप गंभीर आहेत हे बघता आदिल खानची सध्या चौकशी सुरु आहे. आदिलची आधीच एक गर्लफ्रेंडही आहे जिच्याशी तो लग्न करणार आहे. हे सर्व प्रकरण बघता आदिलला जामीन मिळू नये यासाठी राखी पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे.

टॅग्स :राखी सावंतसोशल मीडियाट्रोलनरेंद्र मोदी