Join us

"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 11:19 IST

Rakhi Sawant on Shefali Jariwala Death: 'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. तिच्या निधनानंतर राखी सावंत खूप घाबरली आहे.

'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवाला(Shefali Jariwala)च्या मृत्यूनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. कुटुंबापासून जवळचे मित्रमंडळी आणि तिच्या चाहत्यांना तिच्या निधनाच्या वृत्तावर विश्वासच बसत नाही आहे. अभिनेत्रीचं निधन २७ जून रोजी वयाच्या ४२ वर्षी झाली आहे. शेफालीच्या मृत्यूसंदर्भात अनेक कारणे समोर आली आहेत. मात्र यादरम्यान वारंवार चर्चा होतेय ती स्कीन ट्रिटमेंटची. शेफालीच्या जवळची मैत्रीण पूजा घईने सांगितले की, मृत्यूच्या काही तासांआधी अभिनेत्रीने स्कीन ट्रिटमेंटची ड्रिप घेतली होती.   तर एकीकडे म्हटलं जातंय की, मृत्यूच्या आधी शेफाली फास्टिगंवर होती. त्याचमुळे तिचा बीपी लो झाला आणि तिला हृदयविकाराचा झटका आला. या चर्चेदरम्यान राखी सावंत(Rakhi Sawant)ने अभिनेत्रीच्या निधनावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि म्हटले की, या घटनेनंतर ती खूप घाबरली आहे.

खरेतर सोशल मीडियावर सक्रीय असलेली ड्रामा क्वीन राखी सावंतनेशेफाली जरीवालाच्या निधनानंतर एक व्हिडीओ बनवला आहे. ज्यात तिने शेफालीच्या निधनावर दुःख व्यक्त करत तरुणींना सल्लादेखील दिला आहे. राखी सावंतने व्हिडीओत म्हटलं की, ती खूप घाबरलेली आहे आणि शेफालीला खूप मिस करते आहे. राखी म्हणाली की, तिला आता माहित झालं आहे की, तिचा बीपी लो झाला होता. तिने काहीच खाल्लं नव्हतं. राखीने दावा केला की, इंडस्ट्रीत सुंदर दिसण्यासाठी काय नाही करावं लागतं आणि स्वतः उपाशी राहण्यावरही भाष्य केले. 

''बॉडी शेमिंग व्हायला नाही पाहिजे''राखीने म्हटले की, आता तिने सर्व काही खायला सुरूवात केली आहे. आता तिला उपाशी राहायचे नाही. ती पुढे म्हणते की, जर ती जाडी झाली तर तिला सहन करा. कोणी हे म्हणू नका की ती जाडी आहे. राखीचं म्हणणं आहे की, बारीक झाल्यावर बीपी लो होतो. कारण सगळ्यांचे हार्मोंन्स वेगळे होऊन जातात. त्यामुळे बॉडी शेमिंग व्हायला नाही पाहिजे.

राखी सावंतने तरुणींना दिला हा सल्लाराखीने तरुणींना सल्ला देताना म्हटलं की, भूक लागेल तेव्हा जेवण खा. सर्व खा पण जिम करा. खूप जिम केली पाहिजे. अभिनेत्री म्हणते की, तिने मेकअपदेखील केलेला नाही. तिने स्वतःला सुंदर म्हटलं. शेफालीसोबत जे झाले त्यामुळे तिला भीती वाटू लागली आहे. कारण घरात ती एकटी राहते. आता तिला थोडीपण भूक लागली तर ती जेवण जेवते कारण तिचं म्हणणं आहे की, बीपी कमी नाही झाला पाहिजे आणि वाढलादेखील नाही पाहिजे.

टॅग्स :राखी सावंतशेफाली जरीवाला