Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवराई माझी लाडाची लाडाची गं, नववधू दिशाचं सासूने केले थाटात स्वागत, व्हिडीओ Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 17:34 IST

सासूबाईंनी दिशाचं ओवाळून स्वागत करत असल्याचे पाहायला मिळतंय. लग्नानंतर पहिल्यांदा सासरी नववधू दिशाने एंट्री केली. यावेळी सासूबाईंनी लाडक्या सूनबाईचे मोठ्या थाटामाटात स्वागत केलं.

'बिग बॉस १४' चा स्पर्धक राहुल वैद्य आणि लोकप्रिय अभिनेत्री दिशा परमार त्यांच्या लग्नामुळे चर्चेत होते. आता लग्नानंतर विविध गोष्टी करत चर्चेत आहेत. १६ जुलैला लग्नबंधनात अडकत दोघांनी आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली. विशेष म्हणजे लग्नापूर्वीपासून होणारे मेहंदी, हळद, संगीत सेरमनी ते लग्नापर्यंत सगळ्याच घडामोडी सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. 

या ग्रँड वेडिंगमधली सगळी धम्माल मस्तीचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. आता लग्नानंतरचे राहुल वैद्य आणि दिशा परमारचे नवीन नवीन व्हिडीओ समोर येत त्यांच्या आयुष्यातील खास क्षण रसिकांना पाहायला मिळत आहे. लग्नाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता दिशा परमारचे सासरच्या मंडळींने केलेले ग्रँड वेलकमचा व्हिडीओ समोर आला आहे. 

सासूबाईंनी दिशाचं ओवाळून स्वागत करत असल्याचे पाहायला मिळतंय. दिशाच्या एंट्रीवेळी घरात सगळे नातेवाईक हजर होते. यावेळी दिशाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. नववधू दिशा खूप सुंदर दिसत असून खूप आनंदी दिसतेय. तिच्या चेहऱ्यावर ग्लोदेखील पहायला मिळतोय.हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून चाहत्यांच्याही कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. लग्नानंतर पहिल्यांदा सासरी नववधू दिशाने एंट्री केली.  यावेळी सासूबाईंनी लाडक्या सूनबाईचे मोठ्या थाटामाटात स्वागत केलं. हा व्हिडीओ साऱ्याचंच लक्ष वेधून घेत आहेत.

राहुल वैद्यने दिशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टेलीव्हिजनवरूनच सर्वांसमोर तिला प्रपोज केलं होतं. ८ नोव्हेंबरला दिशाचा वाढदिवस होता आणि त्याचवेळी राहुलने बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांसमोर दिशाला लग्नासाठी मागणी घातली होती. अशाप्रकरे पहिल्यांदाच राहुलने थेट टीव्हीवर त्याच्या प्रेमाची कबूली दिली होती.

टॅग्स :राहुल वैद्य