आरसीबीने पंजाब किंग्सला धूळ चारत थेट आयपीएलच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे आरसीबी आणि विराट कोहलीच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. विराटला जोकर म्हटलेल्या सिंगर राहुल वैद्यनेही आरसीबीनेच यंदाची फायनल जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
राहुल वैद्यला पत्नी दिशा परमान आणि लेकीसोबत एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी पापाराझींशी बोलताना आरसीबी यंदा कप जिंकेल, असं राहुल म्हणाला. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन त्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये राहुल म्हणतो, "यावेळी आरसीबी जिंकेल. आत्तापर्यंत आरसीबीने एकही कप जिंकलेला नाही. मला मनापासून असं वाटतं की यावेळेस आरसीबी जिंकेल. विराटला तर आपण ओळखतोच. मला आरसीबीवर प्रेम आहे. ते कप जिंकतील".
काही दिवसांपूर्वी विराट कोहलीच्या अकाऊंटवरुन राहुल वैद्यला इन्स्टाग्रामवर ब्लॉक करण्यात आलं होतं. राहुलने याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्याला अनब्लॉक केलं गेलं होतं. त्यावेळी राहुलला विराटच्या चाहत्यांकडून ट्रोल करण्यात आलं होतं. तेव्हा राहुलने "विराट कोहलीचे चाहते विराटपेक्षाही जास्त मोठे जोकर आहेत", असं म्हटलं होतं.