प्रसिद्ध गायक राहुल वैद्य आणि त्याची पत्नी दिशा परमार हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. हे दोघेही आपल्या चाहत्यांना नेहमी काही ना काही खास अपडेट देत असतात. त्यांच्या आयुष्यातील खास क्षण ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अलीकडेच राहुल आणि दिशाने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी मुंबईत एक सुंदर घर खरेदी केले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी नव्या घरात त्यांनी आपल्या मुलीसोबत खास गृहप्रवेश पूजा केली आहे. या खास क्षणांचे फोटो त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
राहुल वैद्य आणि दिशा परमार यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते गृहप्रवेशाच्या पूजेला बसलेले दिसत आहेत. या फोटोंमध्ये त्यांच्या लाडक्या लेकची झलकही दिसतेय.
'बिग बॉस'मुळे मिळाली ओळख
राहुल वैद्य हा एक प्रसिद्ध गायक असून त्याने अनेक हिट गाणी दिली आहेत. त्याला खरी ओळख 'बिग बॉस १४' या सलमान खान होस्ट करत असलेल्या शोमधून मिळाली. या शोमध्ये तो ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचला होता. याच शोमध्ये राहुलने दिशाला प्रपोज केले होते आणि शो संपताच या दोघांनी लग्न केलं. आता हे कपल एका गोंडस मुलीचे आई-वडील आहेत. दिशा परमारला शेवटचं 'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेत पाहण्यात आलं होतं, तर राहुल वैद्य 'लाफ्टर शेफ' या शोमध्ये दिसला होता.
Web Summary : Rahul Vaidya and Disha Parmar, a popular celebrity couple, recently purchased a new home in Mumbai. They performed the Griha Pravesh ceremony on Gudi Padwa with their daughter and shared photos on social media. Rahul gained fame from Bigg Boss 14, where he proposed to Disha.
Web Summary : लोकप्रिय जोड़ी राहुल वैद्य और दिशा परमार ने मुंबई में नया घर खरीदा। गुड़ी पड़वा पर बेटी के साथ गृह प्रवेश किया और तस्वीरें साझा कीं। राहुल को बिग बॉस 14 से पहचान मिली, जहाँ उन्होंने दिशा को प्रपोज़ किया था।