Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस १४ मध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या स्पर्धक ठरल्या राधे माँ, एका आठवड्यासाठी मिळणार इतके लाख रुपये

By तेजल गावडे | Updated: October 3, 2020 09:57 IST

बिग बॉस १४मध्ये यावेळी राधे माँ यांचा महिमा पाहायला मिळणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसचा १४वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. यंदा बिग बॉसच्या घरात राधे माँ यांचा महिमा पाहायला मिळणार आहे. खऱ्या आयुष्यात राधे माँ कशा आहेत? बिग बॉसच्या कॅमेऱ्यात राधे माँ यांचा कोणता अवतार टिपला जातोय? या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या सीझनमधील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या स्पर्धक राधे माँ असल्याचं म्हटलं जातंय.

 राधे माँ यांचा प्रोमो रिलीज झाल्यापासून आता त्यांच्याविषयी जाणून घेण्याची सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार बिग बॉस १४च्या स्पर्धकांपैकी राधे माँ यांचा सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या स्पर्धकांच्या यादीत समावेश झाला आहे. राधे माँ यांना एका आठवड्याचे तब्बल २५ लाख रुपये मानधन मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या मानधनाबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

असं समजते आहे की बिग बॉस शोच्या निर्मात्यांना राधे माँ यांना शोमध्ये बोलवण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांनी या शोसाठी होकार दिला. 

समोर आला प्रोमो व्हिडीओ कलर्स चॅनलने आपल्या ट्विटर हँडलरवर आज (मंगळवारी) एक प्रोमो रिलीज केला आहे. या व्हिडीओमध्ये राधे मां बिग बॉसच्या घरात जाताना दिसते आहे. मात्र राधे मां चा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. राधे माँचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर बिग बॉसला घेऊन लोकांमधील उत्सुकता वाढली आहे.

सुखविंदर कौरची लोकप्रियता वाढत गेली सुखविंदर कौर उर्फ राधे मां चा जन्म पंजाबमध्ये झाला आहे. लहान वयात तिने आधात्मचा मार्ग धरला. स्वत: ला देव म्हणवणारे राधे मां, गुरु मां चॅरिटेबल ट्रस्ट चालवते. 

हे लोक जाऊ शकतात बिग बॉसच्या घरात रुबीना दिलाइक, अभिनव शुक्ला, जॅस्मिन भसीन, निशांत सिंह मलखानी, सारा गुरपाल, निक्की तंबोळी, राहुल वैद्य, शार्दुल पंडित, शहजाद पोल, पवित्रा पुनिया, नैना सिंग, प्रतीक सहजल स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात एंट्री घेऊ शकतात.

टॅग्स :बिग बॉसराधे माँ