'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून आपल्या विनोदी शैलीने आख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर. प्रियदर्शनीनं अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं. सध्या प्रियदर्शनी इंदलकर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. चाहत्यांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या लग्नाच्या प्रश्नावर आता खुद्द प्रियदर्शिनीनेच खुलासा केला आहे. आपल्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल तिनं चाहत्यांना सांगितलंय.
प्रणित मोरेच्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये गेलेली असताना प्रियदर्शिनीला तिच्या रिलेशनशिप स्टेटस बद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने स्पष्टपणे 'मी सिंगल आहे' असे उत्तर दिले. इतकेच नाही तर, गेल्या वर्षी म्हणजेच एप्रिल २०२५ मध्ये तिचे ब्रेकअप झाल्याचेही तिने जाहीर केले.
रिलेशनशिप Toxic होतं का?ब्रेकअपचे कारण सांगताना प्रियदर्शिनी म्हणाली, "आमच्यात 'Compatibility' नव्हती. तो किंवा मी वैयक्तिकरित्या Toxic नव्हतो, पण आमचे नाते मात्र Toxic झाले होते". तिने पुढे स्पष्ट केले की, ब्रेकअपचा निर्णय तिचा स्वतःचा होता. "तो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता आणि त्याला लवकर लग्न करायचे होते. मला मात्र करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते, लग्नाची घाई नव्हती. यावरून आमच्यात वाद सुरू झाले आणि शेवटी आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला".
Web Summary : Marathi actress Priyadarshini Indalkar clarified she's single, revealing her breakup last April due to incompatibility and differing life goals. She prioritized her career over marriage, leading to the split.
Web Summary : मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर ने स्पष्ट किया कि वह सिंगल हैं। उन्होंने बताया कि पिछले अप्रैल में असंगति और अलग-अलग जीवन लक्ष्यों के कारण उनका ब्रेकअप हो गया था। उन्होंने शादी से ज्यादा अपने करियर को प्राथमिकता दी, जिसके कारण अलगाव हुआ।