Join us
Daily Top 2Weekly Top 5

नांदा सौख्य भरे! 'प्रितीचा वनवा उरी पेटला' फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, खास क्षणांचा व्हिडिओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 17:14 IST

'प्रितीचा वनवा उरी पेटला' फेम अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत, व्हिडिओ आला समोर

बॉलिवूडबरोबर मराठी सिनेविश्वातही लग्नाचे वारे वाहत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मराठी कलाविश्वातील तब्बल ४ सेलिब्रिटींनी साखरपुडा करत प्रेमाची कबुली दिली. त्यापाठोपाठ आता टीव्हीवरील एका अभिनेत्याने लग्नगाठ बांधली आहे. 'प्रितीचा वनवा उरी पेटला' मालिकेतील अभिनेता लग्नाच्या बेडीत अडकला आहे. 

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका असलेल्या 'प्रितीचा वनवा उरी पेटला' फेम अभिनेता हेमंत पारांडे विवाहबंधनात अडकला आहे. मालिकेत बलराम ही भूमिका साकारणाऱ्या हेमंतने खऱ्या आयुष्यात नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हेमंतच्या पत्नीचं नाव मोनिका असं आहे. मराठी मनोरंजन विश्व या इन्स्टाग्राम पेजवरुन त्याच्या लग्नसोहळ्यातील खास क्षणांचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हेमंत आणि मोनिकाचा विवाहसोहळा संपन्न झाला. लग्नासाठी हेमंतने कुर्ता पायजमा परिधान करत त्यावर हिरव्या रंगाचं जॅकेट घातलं होतं. तर त्याच्या पत्नीने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. लग्नाआधी त्यांचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्यासाठी त्यांनी दाक्षिणात्य लूक केला होता. त्यांच्या लग्नाला 'पिरतीचा वनवा उरी पेटला' मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती.  

टॅग्स :सेलिब्रेटी वेडिंगटिव्ही कलाकारमराठी अभिनेता