Join us

प्रीतिका राव आणि प्रियांक शर्मा गोड जोडी झळकणार या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 16:21 IST

नवी मालिका 'लाल इश्क' सादर करण्यास सज्ज झाली आहे. विविध भागांमधील या मालिकेत प्रेक्षकांना टेलिव्हिजनवरील अनेक लोकप्रिय चेहरे पाहता ...

नवी मालिका 'लाल इश्क' सादर करण्यास सज्ज झाली आहे. विविध भागांमधील या मालिकेत प्रेक्षकांना टेलिव्हिजनवरील अनेक लोकप्रिय चेहरे पाहता येणार आहेत. रोमान्स आणि थ्रीलचा अप्रतिम मेळ साधत या मालिकेत 'प्रेमकथेचा गोड शेवट' या ठरलेल्या उक्तीवरच प्रश्नचिन्ह लागणार आहे. कारण या मालिकेत काही अत्यंत उत्कट अशा प्रेमकथांमधील एक दैवी चमत्कारांचा भाग असणार आहे.जूनपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात एपिसोडप्रमाणे कथा दाखवल्या जातील. तुमच्या हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या मात्र काही वेळा श्वास रोखायला लावणाऱ्या काहीशा अजब कथांचे सादरीकरण करण्यासाठी यात टेलिव्हिजन क्षेत्रातील काही लोकप्रिय जोडपी किंवा चेहरे सहभागी होणार आहेत. या अनोख्या प्रेमकथांची सुरुवात करण्यासाठी निर्मात्यांनी प्रियांक शर्मा आणि प्रीतिका राव या दोघांची निवड केली आहे. योगायोग असा की या दोघांनी यापूर्वीही एकत्र काम करण्याचं अनेकदा ठरवलं. मात्र, काही ना काही कारणाने ते एकत्र पडद्यावर दिसलेच नाहीत आणि दरवेळी त्यांच्या चाहत्यांची निराशा होत राहिली. पण, आता असं वाटतंय की या दोघांनी पुन्हा एकत्र काम करावं, हा दैवी संकेतच आहे आणि या दोघांच्या पुनरागमनासाठी लाल इश्कसारखा दुसरा योग्य पर्याय नाही.या कार्यक्रमातील आपल्या सहभागाविषयी प्रीतिका म्हणाली, "एक प्रेक्षक म्हणून मला नेहमीच पठडीबाहेरचा विचार असलेल्या लघुकथा आवडल्या आहेत. मी पहिल्यांदाच या प्रकारच्या दैवी शक्तींवर आधारित कार्यक्रमात काम करणार आहे आणि अर्थातच त्यामुळे मी फारच उत्साहितही आहे." ती पुढे म्हणाली, "मी प्रियांकसोबत यापूर्वीही काही कार्यक्रमांसाठी काम केलं आहे. मात्र, काही ना काही कारणाने ते पूर्ण होऊ शकलं नाही. मात्र, आम्ही कायम एकमेकांच्या संपर्कात होतो. अखेर पडद्यावर एकत्र दिसण्याठी आम्हाला अप्रतिम संधी मिळाली आहे आणि या कार्यक्रमातच आम्ही एकत्र दिसावं, ही बहुधा नियतीचीच इच्छा होते. आमचे चाहतेही याचीच वाट पाहत आहेत." या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर अत्यंत उत्साही असलेला प्रियांक म्हणाला, "मला प्रेमकथांचा भाग असणे, नेहमीच आवडते. पण,'लाल इश्क'मधील वेगळेपण म्हणजे यातील कथांना असलेली एक चमत्कारिक आणि गूढ बाजू यामुळेच ही मालिका वेगळी आणि खास ठरते.मला जे पात्र सांगण्यात आले ते ऐकताच मी होकार दिला! शिवाय, पुन्हा एकदा प्रीतिकासोबत काम करणे ही सुद्धा आनंदाची बाब आहे." या खास मालिकेच्या पहिल्या भागासाठी कलाकार सज्ज झाले आहेत. त्यामुळे &TV च्या चाहत्यांना लवकरच एक छान कार्यक्रम पहायला मिळणार आहे.