Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाद ओकच्या लेकाचा पार पडला साखरपुडा, अमृता खानविलकरने शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 10:06 IST

मराठीतील प्रसिद्ध जोडी प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांचा मोठा लेक लवकरच बोहल्यावर चढणार आहे. नुकताच प्रसाद आणि मंजिरी यांच्या लेकाचा साखरपुडा पार पडला आहे. याचे फोटो समोर आले आहेत. 

कलाविश्वात सध्या सनई चौघडेचा सूर ऐकू येत आहे. अनेक सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपलच्या देखील लग्नाची तयारी सुरू आहे. मराठीतील प्रसिद्ध जोडी प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांचा मोठा लेक लवकरच बोहल्यावर चढणार आहे. नुकताच प्रसाद आणि मंजिरी यांच्या लेकाचा साखरपुडा पार पडला आहे. याचे फोटो समोर आले आहेत. 

प्रसाद आणि मंजिरी ओक यांचा मोठा मुलगा सार्थकचा साखरपुडा संपन्न झाला आहे. सोशल मीडियावर सार्थकच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये प्रसादचं अख्खं कुटुंब दिसत आहे. सार्थकच्या होणाऱ्या पत्नीचं नाव रितू असं आहे. सार्थकने आणि रितूने साखरपुड्यासाठी खास लूक केला होता. पण संपूर्ण लाइमलाइट ही प्रसाद आआणि त्याची पत्नी मंजिरीनेच लुटल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. सार्थक आणि रितूच्या साखरपुड्याला कलाविश्वातील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. अमृता खानविलकर, स्वप्निल जोशी उपस्थित होते. 

प्रसाद आणि मंजिरी यांना दोन मुलं आहेत. मोठ्या मुलाचं नाव सार्थक आहे तर छोट्याचं मयांक असं आहे. सार्थकने जर्मनीमधून त्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याच्या कॉन्व्होकेशन सेरेमनीला प्रसाद आणि मंजिरी यांनी हजेरी लावत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. सार्थक त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. तर प्रसाद आणि मंजिरीदेखील सासू आणि सासरा या भूमिकेत जाणार आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Prasad Oak's son gets engaged; Amruta Khanvilkar shares photos.

Web Summary : Prasad Oak's elder son, Sarthak, recently got engaged to Ritu. Celebrities like Amruta Khanvilkar and Swapnil Joshi attended. Sarthak completed his education in Germany. Prasad and Manjiri Oak are now stepping into new roles as in-laws.
टॅग्स :प्रसाद ओक सेलिब्रिटी