शिल्पा शेट्टीच्या 'बॅस्टियन' या रेस्टॉरंटमध्ये नेहमी सेलिब्रिटींची गर्दी असते. 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील कलाकारांनीही नुकतीच 'बॅस्टियन'मध्ये पार्टी केली. याचे फोटो सावली म्हणजेच अभिनेत्री प्राप्ती रेडकरने (Prapti Redkar) पोस्ट केले आहेत. मेघा धाडे(Megha Dhade), तिची लेक साक्षी आणि भाग्यश्री दळवीसोबत प्राप्तीने पार्टी एन्जॉय केली. यामध्ये चौघींचाही स्टायलिश लूक दिसत आहे.
प्राप्ती रेडकर, मेघा धाडे यांची 'सावळ्याची जणू सावली' मालिका गाजत आहे. या मालिकेमुळे प्राप्तीला कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. प्राप्ती आणि मेघा धाडे यांची ऑनस्क्रीन जरी टशन दाखवली असली तरी ऑफस्क्रीन दोघींचा बॉन्ड एकदम मैत्रीपूर्ण आहे. तसंच मेघा धाडेची लेक साक्षी सुद्धा प्राप्तीची चांगली मैत्रीण दिसतेय. दादरच्या बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये त्यांनी मस्त पार्टी केली. त्यांच्यासोबत अभिनेत्री भाग्यश्री दळवीही दिसत आहे.
प्राप्तीने तिचे काही सोलो फोटोही शेअर केलेत. येलो ऑकर रंगाच्या प्रिंटेड डीप नेक शॉर्ट वनपीसमध्ये ती क्लासी दिसत आहे. या लूकमध्ये तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. किती गोड दिसतेय म्हणत प्राप्तीच्या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या आहेत.
प्राप्ती रेडकरने याआधी 'काव्यांजली' या मालिकेतही काम केलं होतं. ती फक्त २० वर्षांची आहे. अगदी कमी वयात तिला टीव्ही क्षेत्रात कमालीचं यश मिळालं आहे. तसंच इन्स्टाग्रामवर तिच्या चाहतावर्गात दिवसेंदिवस वाढच होत आहे.