Join us

Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं थाटामाटात साजरा केला वडिलांचा वाढदिवस, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 16:52 IST

Prajakta Mali : प्राजक्ता माळीने नुकताच तिच्या वडिलांचा आणि आत्याचा ६१वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. सोशल मीडियावरील पोस्ट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे प्राजक्ता चर्चेत येत असते. दरम्यान आता तिची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. 

प्राजक्ता माळीने नुकताच तिच्या वडिलांचा आणि आत्याचा ६१वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो आणि व्हिडीओ शेअर करून प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहिले की, पप्पा आणि आत्या - या जुळ्या भावंडांची ६१ वी… प्राजक्ता माळीच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. चाहते तिच्या वडिलांना आणि आत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झालं तर तिने नुकतेच एका आगामी मराठी चित्रपटाचं शूटिंग केले आहे. त्यासाठी ती लंडनला गेली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, वैभव तत्ववादी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेता ऋषिकेश जोशी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. ती शेवटची लकडाउन चित्रपटात अंकुश चौधरीसोबत दिसली होती. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात पाहायला मिळत आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळीमहाराष्ट्राची हास्य जत्रा