Join us  

Video : डोक्यावर ग्लास अन् बॉबी देओलसारखा डान्स; प्राजक्ता माळीवर चढला 'जमाल कुडु'चा फिव्हर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 1:55 PM

बॉबी देओलच्या गाण्यावर प्राजक्ताचा भन्नाट डान्स, 'जमाल कुडु' गाण्याचा व्हिडिओ व्हायरल

'ॲनिमल'मधील 'जमाल कुडु' या गाण्याची क्रेझ काही केल्या संपत नाहीये. या गाण्याने अनेकांना भुरळ घातली आहे. बॉबी देओलच्या या गाण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक सेलिब्रिटींनाही 'जमाल कुडु'वर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. आता प्राजक्ता माळीवरहीबॉबी देओलच्या 'जमाल कुडु'चा फिव्हर चढला आहे. प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

अनेक सेलिब्रिटींनी सरत्या वर्षाला निरोप देत २०२४चं जंगी सेलिब्रेशन केलं. प्राजक्तानेही २०२३च्या थर्टी फर्स्टचं कुटुंबीयांसोबत दमदार सेलिब्रेशन केलं. याचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे. या व्हिडिओत प्राजक्ता आणि तिचे कुटुंबीय जमाल कुडु गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. कुणी डोक्यावर पाण्याचा जग, कुणी बाटली घेऊन नाचताना दिसत आहे. प्राजक्ताही बॉबी देओलसारखं डोक्यावर ग्लास घेऊन 'जमाल कुडु'वर डान्स करत आहे. हा मजेशीर व्हिडिओ प्राजक्ताने शेअर केला आहे. 

'जमाल कुडु' गाण्यावरील प्राजक्ताचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत. प्राजक्ताच्या या व्हिडिओवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. प्राजक्ताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं सूत्रसंचालन करत आहे. 

टॅग्स :प्राजक्ता माळीबॉबी देओलटिव्ही कलाकार