Join us

"फुल बॅटिंग चालुए तुझी...", ज्येष्ठ अभिनेत्यानंतर आता प्रसिद्ध संगीतकाराचा प्राची पिसाटला मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:11 IST

त्यांनी किती वाजता मेसेज पाठवला? राहुल रानडेंचा प्राचीला प्रश्न, म्हणाले...

सध्या मराठी इंडस्ट्रीत एक मुद्दा चर्चेत आहे. अभिनेत्री प्राची पिसाटला (Prachi Pisat) ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशिळकर (Sudesh Mhashilkar) यांनी आक्षेपार्ह मेसेज केले. प्राचीने तो स्क्रीनशॉट शेअर करत त्यांचं पितळ उघडं पाडलं. तसंच त्यांचं अकाऊंट हॅक झालेलं नसून याआधीही त्यांनी असे मेसेज केले आहेत याचा पुरावा दाखवला. मराठी इंडस्ट्रीतील अनेकांनी प्राचीला पाठिंबा दिला. दरम्यान सुदेश म्हशिळकरांनी अद्याप यावर स्पष्टीकरण दिलेलं नाही आणि ना माफी मागितली आहे. माध्यमांमध्ये सध्या ही बातमी खूप चर्चेत असतानाच आता प्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे (Rahul Ranade) यांनी प्राचीला विचित्र मेसेज केला आहे. ज्यावर प्राचीने त्यांना खणखणीत उत्तर दिलं आहे.

राहुल रानडे हे मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध संगीतकार आहेत. ३० वर्षांपासून ते कार्यरत आहेत. अनेक मराठी नाटक, चित्रपट, हिंदी सिनेमांसाठी त्यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. अशा नावाजलेल्या संगीतकाराने प्राची पिसाटला मेसेज करत लिहिले, "हॅलो PP, फुल बॅटिंग चालू आहे तुझी. हाहाहा...सगळ्या न्यूज पोर्टल्सने हा मुद्दा उचलून धरला आहे. खरंतर मी सुदेशला वैयक्तिकरित्या ओळखतो. मला एक सांग...त्याने नक्की कोणत्या वेळेला हे मेसेज केले होते? कारण सामान्यत: लोक रात्री नशेत असे मेसेज करतात."

"गप्प बसायचं नाही...", शिल्पा नवलकरांनी प्राची पिसाटचं केलं कौतुक; समीर विद्वांस, रुचिराचीही कमेंट

राहुल रानडेंच्या या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत प्राचीने खणखणीत उत्तर देत लिहिले, "अजून एक नमुना...तू पागल आहेस का? काय बोलतोय कळतंय का? नशेत असल्याने मुलींना मेसेज करणं हे कुठलं कारण होत नाही. ते गैरवर्तनच आहे. मी कोणाचंही मनोरंजन करण्याचा ठेका घेतलेला नाही. आणि कोणत्याही मुलीने मग ते वेळ, वय आणि परिस्थिती बघून गैरवर्तन सहन करण्याचा ठेका घेतलेला नाही. छोटं असो किंवा मोठं गैरवर्तन झालं तर त्याविरोधात मुलीला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर तुझी ही मानसिकता असेल तर तू नशेत असताना आत्ता तुझे किती चॅट बाहेर निघतील हे तुला कळणारही नाही."

घडलेल्या घटनेनंतर पाच दिवस उलटून गेले तरी सुदेश म्हशिळकर गप्प आहेत. त्यांनी साधी माफी मागितलेली नाही हेही प्राचीने स्पष्ट केलं. तसंच आपण कोणावर आरोप केलेले नाहीत फक्त स्क्रीनशॉट केले आहेत असंही ती म्हणाली. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेतासंगीतसोशल मीडिया