Join us

पूजाने शेअर केला आतापर्यंतचा सर्वात ग्लॅमरस फोटो, चाहते करतायेत लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 07:00 IST

बोल्ड फोटो शेअर करायची पूजाची ही पहिलीच वेळ नाही.

पूजा सावंत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. तसेच आपल्या आगामी प्रोजेक्टबदलची माहिती ही पूजा तिच्या फॅन्सना देत असते. अलीकडेच पूजाने तिचा ब्लॅक शर्टमधला एका फोटो शेअर केला आहे. ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये पूजा बोल्ड आणि ग्लॅमरस दिसतेय. बोल्ड फोटो शेअर करायची पूजाची ही पहिलीवेळ नाही याआधी तिने तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत चर्चेत राहिली आहे. 

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पूजा सध्या 'महाराष्ट्राच्या बेस्ट डान्सर'मध्ये परिक्षकाची भूमिका साकारते आहे.. आता मराठी रसिकांची मनं जिकंल्यानंतर तिने बॉलिवूडमध्येही एंट्री केली. 'जंगली' सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत होती.

टॅग्स :पूजा सावंत