Pooja Sawant Kokan House : महाराष्ट्राची 'कलरफुल' अभिनेत्री पूजा सावंत हिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या पूजा सिनेसृष्टीतील कामातून ब्रेक घेत कोकणातील आपल्या निसर्गरम्य घरी निवांत वेळ घालवत आहे. दरवर्षी वर्षातून काही दिवस पूजा आवर्जून कोकणात जाते. मात्र, यावेळी पूजाच्या कोकणातील घरी एका खास पाहुणा पोहचला. हा पाहुणा दुसरा कोणी नसून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता निखिल बने आहे. निखिलने स्वतः या भेटीचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
निखिलने त्याच्या सोशल मीडियावर पूजाला भेटल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला निखिल म्हणतो की, "सध्या मी कोकणात आहे आणि इकडे आल्यावर कळलं की एक खास व्यक्तीसुद्धा कोकणातच आहे. तर आज आपण त्या खास व्यक्तीला भेटायला जात आहोत". निखिल केवळ भेटायलाच गेला नाही, तर पूजासाठी घरून खास 'पुरणपोळी' घेऊन गेला होता. पूजाच्या घरी पोहोचताच तिची बहीण रुचिरा आणि भाऊ श्रेयस यांनी निखिलचं मनापासून स्वागत केलं.
निखिलला आपल्या समोर पाहून पूजा सावंतला मोठा धक्काच बसला. "हे माझ्यासाठी एक गोड सरप्राईज होतं, मला कल्पनाच नव्हती की निखिल घरी येणार आहे", अशा भावना तिने व्यक्त केल्या. यावेळी पूजाने निखिलला तिचं सुंदर घर फिरवून दाखवलं. पूजाच्या या कोकणातल्या घराच्या आजूबाजूला नारळ, केळी आणि आंब्याची अनेक झाडे पहायला मिळत आहेत. या भेटीचं खास आकर्षण ठरलं ते म्हणजे पूजाची बाईक राईड. निखिलच्या बाईकवर मागे बसून पूजाने कोकणच्या रस्त्यांचा आनंद लुटला, ज्याचा फोटो निखिलने इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे.
Web Summary : Actor Nikhil Bane surprised Pooja Sawant at her Konkan home, bringing homemade Puranpoli. Pooja showed Nikhil her house surrounded by coconut, banana, and mango trees, and they enjoyed a Konkan bike ride.
Web Summary : अभिनेता निखिल बने ने पूजा सावंत को उनके कोंकण स्थित घर पर चौंका दिया, घर का बना पुरणपोली लेकर पहुंचे। पूजा ने निखिल को नारियल, केले और आम के पेड़ों से घिरा अपना घर दिखाया और उन्होंने कोंकण में बाइक की सवारी का आनंद लिया।