Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रिय मालिकेने घेतला ५ वर्षांचा लिप, मयुरा-ओंकारची मुलगी ताराची भूमिका साकारणार सई रेवाडीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 22:39 IST

 'पिंजरा खूबसूरती का'  मालिकेत  असे काही घडणार आहे की  ज्यामुळे रसिकांना धक्काच बसेल. ही मालिका फास्ट फॉरवर्ड होऊन तब्बल 5 वर्षांचा लिप घेणार आहे.

छोट्या पडद्यावर वर्षानुवर्षे मालिकांची भाऊगर्दी झाली आहे. मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं, एकामागून एक भागातून घराघरात या मालिका लोकप्रिय ठरतात. त्यापैकीच ही एक मालिका आहे.  'पिंजरा खूबसूरती का'  मालिकेत  असे काही घडणार आहे की  ज्यामुळे रसिकांना धक्काच बसेल. ही मालिका फास्ट फॉरवर्ड होऊन तब्बल 5 वर्षांचा लिप घेणार आहे.  'पिंजरा खूबसूरती का' मालिकेने अल्पावधीतच चाहत्यांची पसंती मिळवली होती. आता मालिका आणखीन रंजक वळणावर आली आहे. नवीन ट्विस्ट आणि टर्नसह मालिका पाहणे रसिकांसाठी नक्कीच रंजक ठरणार आहे. मालिकेतली सगळीच पात्रव चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरली आहेत. मालिका ५ वर्षांनी पुढे जाणार म्हटल्यावर नवीन कलाकाराचेही दर्शन रसिकांना घडणार आहे. 

कथानकात  ओंकार सिंगापूर मध्ये स्थायिक झाला आहे आणि तो त्याच्या मुलीचा ताराचा जन्मदिवस साजरा करत आहे. तारा भूमिकेत सई रेवाडीकर झळकणार आहे. तारा ही मयुरा आणि ओंकारची मुलगी दाखवण्यात आली आहे. ती एक सुंदर गोड मुलगी असून खेळकर आहे आणि कठोर आव्हाने स्विकारण्यात तिला लाज वाटत नाही. असे म्हटले जाते की तिला नेहमीच तिच्या आईची मयुराची आठवण येते. 

मयुराची भूमिका करणारी रिया शर्मा म्हणाली, “पिंजरा खूबसूरती का हा असा शो आहे जो शक्तीपासून शक्ती पर्यंत विकसित झाला आहे. वेड, सौंदर्य आणि प्रेमाची हृद्यस्पर्शी कथा जी प्रेक्षकांच्या मनात खोलवर रूजली आहे. या शो मध्ये मयुरा आणि ओंकारची प्रेमभरी कथा आतापर्यंत दाखविली गेली आहे.

 

जी नाट्यमय होती आता त्यांच्या जीवनात एक नवे प्रकरण उघड होणार आहे, कारण त्यांची मुलगी तारा त्यांच्या जीवनात येणार आहे आणि अनेक गोष्टी बदलणार आहेत. हा खूप मनोरंजक प्रवास असणार आहे आणि या नव्या स्थिती विषयी मी खूप उत्सुक आहे.”