Join us

“फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील किर्तीचा सुरु होणार नवा प्रवास, म्हणाली- ही संधी चालून आली ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 18:42 IST

फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून घराघरात पोहचली समृद्धी केळकर लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा (Phulala Sugandh Maticha) या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेच्या कथानकात नेहमी विविध ट्विस्ट पाहायला मिळाले होते. या मालिकेत किर्तीची भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकर(Samruddhi Kelkar)ने निभावली होती. या मालिकेतून ती घराघरात पोहचली आहे. समृद्धी केळकर लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाच्या सुत्रसंचलनाची जबाबदारी समृद्धी केळकर पार पाडणार आहे. समृद्धी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

नव्या वर्षात हे नवं आव्हान स्वीकारताना समृद्धी म्हणाली, ‘मला सूत्रसंचलनाची आवड होती. मात्र संधी मिळाली नव्हती. जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाच्या निमित्ताने ही संधी चालून आली. मला हा नवा प्रयोग करताना अतिशय आनंद होत आहे. हे पर्व ज्युनियर्सचं अर्थातच ४ ते १४ या वयोगटातल्या चिमुकल्यांचं आहे. त्यामुळे या बच्चेकंपनीला संभाळत मला सूत्रसंचालन करायचं आहे. माझ्या करिअरची सुरुवात अश्याच एका डान्स रिऍलिटी शो ने झाली होती. रिऍलिटी शोमधून खूप गोष्टी शिकायला मिळतात. नृत्यावरचं माझं प्रेम सर्वांना ठाऊकच आहे. त्यामुळे  मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा मंच खूपच खास आहे. स्पर्धकांना थिरकताना पाहून माझेही पाय थिरकायला लागतात. आमचा सुपरजज अंकुश चौधरी आणि कॅप्टन्स वैभव घुगे आणि फुलवा खामकर यांनी या कार्यक्रमात वेगळी रंगत आणली आहे.

समृद्धी केळकर उत्तम अभिनेत्रीसोबत उत्तम नृत्यांगनादेखील आहे. तिने कथ्थकमध्ये अलंकारची पदवी घेतली आहे. तिने याआधी लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेत भूमिका साकारली आहे. तसेच तिने पुढचं पाऊल व लेक माझी लाडकी या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. लावणीवर आधारित असलेल्या ढोलकीच्या तालावर या डान्स शोमध्येही ती सहभागी झाली होती.

टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्रवाहअंकुश चौधरी