Join us
Daily Top 2Weekly Top 5

​छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला त्याचा लहानपणीचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 14:16 IST

छोट्या पडद्यावरील काहे दिया परदेस या मालिकेतून अभिनेता ऋषी सक्सेना घराघरात पोहचला. त्याने साकारलेला शिव रसिकांना चांगलाच भावला. शिव ...

छोट्या पडद्यावरील काहे दिया परदेस या मालिकेतून अभिनेता ऋषी सक्सेना घराघरात पोहचला. त्याने साकारलेला शिव रसिकांना चांगलाच भावला. शिव आणि गौरीची जोडी छोट्या पडद्यावरील हिट जोडी ठरली. काही महिन्यांपूर्वी 'काहे दिया परदेस' या मालिकेने रसिकांचा निरोप घेतला. ही मालिका संपून काही महिने झाले असले तरी ऋषीची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. काहे दिया परदेस या मालिकेनंतर आता ऋषी सक्सेना काय करतो आहे हे जाणून घ्यायची रसिकांना नक्कीच उत्सुकता लागली होती. आता या मालिकेनंतर तो घाडगे & सून या मालिकेत झळकणार आहे. त्याने नुकताच त्याच्या लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोमध्ये तो खूपच क्यूट दिसत आहे. या फोटोवर त्याच्या फॅन्सने देखील भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच या फोटोला अनेकांनी लाइक देखील केले आहे.शिव म्हणजेच ऋषी सक्सेना काहे दिया परदेस ही मालिका सुरू असतानाच त्याच्या बॉडीवर विशेष मेहनत घेत होता. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांप्रमाणे तोही अॅब्ज कमावण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. काहे दिया परदेस या मालिकेने ऋषीला बरीच लोकप्रियता दिली. मराठीच नाही तर हिंदी भाषिक रसिकांचाही तो आवडता बनला. मराठी नसूनही मोठ्या खुबीने त्याने शिव साकारला. त्यामुळेच मालिका सुरू असताना त्याला हिंदीतून बड्या प्रोजेक्ट्सच्या ऑफर आल्या. त्यासाठीच तो आता बॉडी कमावतो आहे. आता बॉलिवूडच्या दिग्गजांच्या पावलावर पाऊल ठेवून ऋषीसुद्धा अॅब्ज कमावून आपल्या बॉलिवुड पदार्पणासाठी सज्ज होत तर नाही ना अशा शंकांनाही नक्कीच वाव आहे. मध्यंतरी तो हिंदीत मालिका किंवा वेबसिरीज करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती ऋषीकडून समोर आलेली नाही. ऋषी सक्सेनाला काहे दिया परदेस या मालिकेत प्रेक्षकांचे जे प्रेम मिळाले, तेच घाडगे & सून मालिकेत देखील मिळेल अशी त्याला नक्कीच खात्री आहे. Also Read : घाडगे & सून या मालिकेत होणार छोट्या पडद्यावरच्या या प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री, वर्षभराने करणार छोट्या पडद्यावर कमबॅक