Join us

'माझ्या शरीरातील हा अवयव नकली', राखी सावंतचा मोठा खुलासा; यासाठी मोजावे लागले इतके लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 14:22 IST

अभिनेत्री राखी सावंतची पुन्हा एकदा बिग बॉस १५मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने चर्चेत येणारी अभिनेत्री राखी सावंतने पुन्हा एकदा बिग बॉस १५मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री केली. यावेळी बिग बॉसच्या घरात एकटी गेली नसून तिचा नवरा रितेशही सहभागी झाला आहे. त्यामुळे राखी आणि तिचा नवरा हे दोघेही प्रेक्षकांचे मुख्य आकर्षण राहिले आहेत. दरम्यान आता शोमध्ये राखी सावंतने स्वतःबद्दलचा एक मोठा खुलासा केला आहे. तिने तिच्या शरीराचा एक भाग बनावट असल्याचा खुलासा केला आहे.

बिग बॉस १५ च्या घराचे लाईव्ह स्ट्रीमिंग ओटीटी प्लॅटफॉर्मवर केले जाते. ज्यामध्ये अनेक भाग आणि किस्से एक तासाच्या एपिसोडचा भाग बनत नाहीत. या लाईव्हमध्ये राखी सावंतने एक मोठा खुलासा केला. तो सीनही एपिसोडचा भाग बनवण्यात आलेला नाही. राखी सावंतने बिग बॉसच्या घरात सांगितले की, तिचे सगळे दात नकली आहेत. तिने खोटे दात बसवले आहेत.

राखीच्या एका दाताची किंमत आहे १ लाख रुपयेराखीने म्हणाली की, तिच्या दातांची किंमत लाखोंमध्ये आहे. राखी सावंतच्या दातांची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल. राखी सावंतने १६ बनावट दात बसवले असून त्याची किंमत १६ लाख रुपये आहे. राखी सावंतने एका दातासाठी १ लाख रुपये मोजले आहेत.राखी सावंतचा हा खुलासा ऐकून तेजस्वी प्रकाशलाही धक्का बसला आहे. 

टॅग्स :राखी सावंतबिग बॉस