Join us

भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 11:03 IST

३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. दोन आठवड्यांनी या अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या घरात वाईट अवस्थेत मिळाला आहे

मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल हुमायरा असघर अलीचं निधन झालंय. हुमायरा ३२ वर्षांची असून तिचा मृतदेह कराची येथील एका अपार्टमेंटमध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या मृत्यूला सुमारे १५ ते २० दिवस उलटले होते. या घटनेमुळे  मनोरंजन क्षेत्रात आणि अभिनेत्रीच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जाणून घ्या सविस्तर प्रकरण

हुमायराच्या मृत्यूने सर्वांना धक्का

ही घटना कराचीच्या डिफेन्स हाउसिंग अथॉरिटी (DHA) परिसरातील इत्तिहाद कमर्शियल भागात घडली. याच भागात हुमायराचा फ्लॅट होता. हुमायरा तिच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी सांगितलं की, अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याचं शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर हुमायराचा मृतदेह आढळला. पोलिस अधिकारी सैयद असद रझा यांनी सांगितलं की, मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत होता. मृतदेहावर गंभीर जखम आढळून आली नाही.

त्यामुळे हुमायराचा नैसर्गिक मृत्यू असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र मृत्यूचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. हुमायरा असघर ही पाकिस्तानी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री असून ती ‘तमाशा घर’ मालिकेत दिसली होती. याशिवाय मॉडेलिंग क्षेत्रातही तिचं मोठं नाव होतं. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त करत सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत असून, घरातील CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्यात येत आहेत. या घटनेसंदर्भात कुटुंबीयांशीही संपर्क साधला जात आहे. 

टॅग्स :पाकिस्तानटेलिव्हिजन