Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान भाऊ भाऊ! पाकिस्तानी अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणते- "आपण दुरचे नातेवाईक..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:48 IST

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हनियाने भारत-पाकिस्तानबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

पाकिस्तानी अभिनेत्री हनिया आमिरचा भारतातही चाहता वर्ग मोठा आहे. 'दिसरुबा', 'तितली', 'इश्किया', 'संग-ए-माह' या तिच्या गाजलेल्या पाकिस्तानी मालिका. 'मेरे हमसफर' या मालिकेतील हला या भूमिकेने तिला भारतात लोकप्रियता मिळवून दिली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हनियाने भारत-पाकिस्तानबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

हनियाने नुकतीच सीएनएनला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने भारत-पाकिस्तान संबंधांबद्दल भाष्य केलं. भारत-पाकिस्तान चुलत भाऊ असल्याचं विधान हनियाने केलं आहे. ती म्हणाली, "माझे भारतात खूप चाहते आणि मित्रमैत्रिणी आहेत. मला गेल्या काही वर्षांत हे जाणवलं आहे की या दोन्ही देशांमधील लोक हे एकसारखे आहेत. दोन्ही देशांतील लोक एकमेकांचं कौतुक करतात. आपण दुरचे चुलत नातेवाईक असल्यासारखे आहोत. आपण एकमेकांची मदतही करतो, ही चांगली गोष्ट आहे". हनियाच्या या उत्तराने चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. 

हनियाकडे पाकिस्तानमध्ये जेन झीचा चेहरा म्हणून पाहिलं जातं. याबबात ती म्हणाली, "मी जेन झीचा चेहरा आहे, या गोष्टीला फार महत्त्व देत नाही. मी स्वत:शी खरेपणाने आणि ईमानदारीने वागण्याचा प्रयत्न करते". 

टॅग्स :सेलिब्रिटीपाकिस्तानटिव्ही कलाकार