Join us
Daily Top 2Weekly Top 5

हीच का ती ? 'पाहिले न मी तुला'मधील मनूचा फोटो पाहून तुम्हाला ही पडेल प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 15:36 IST

झी मराठीवरील 'पाहिले न मी तुला' ही मालिकाप्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

झी मराठीवरील 'पाहिले न मी तुला' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतून तन्वी प्रकाश मुंडळे हा चेहरा घराघरात पोहोचला.  या मालिकेतून आपल्या निरागस, सोज्वळ अभिनयाने तन्वी मुंडले हिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तन्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो ती शेअर करत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. तिच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर नजर टाकली तर ही गोष्ट सहज लक्षात येते. तन्वीने शेअर केलेल्या ब्लॅक रंगाच्या टॉपमध्ये ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसतेय. तन्वीला अभिनयासह नृत्याचीदेखील आवड आहे.

तन्वीने याआधी ‘अ रिस्पेक्टेबल वेडिंग’, ‘कुनाचा कुनाला मेळ न्हाई’ अशा नाटकांतून तीने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. लवकरच ती सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकरसोबत “COLORफूल” या सिनेमात देखील झळकणार आहे. “COLORफूल” हा सिनेमा 2 जुलै 2021ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा तन्वीचा पहिलाच सिनेमा आहे. तन्वीला अभिनयासह नृत्याचीदेखील आवड आहे. पुण्यात लहानाची मोठी झालेली तन्वी फिजिक्स मधून बीएस्सी केलं आहे. 

सध्या या मालिकेचे शूटिंग दुसऱ्या राज्यात सुरु आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे बऱ्याच मालिकेचे शूटिंग महाराष्ट्राभर सुरु आहे. राज्यातले लॉकडाऊन पुन्हा एकदा 15 मेपर्यंत वाढवण्यात होत आहे. अशात मनोरंजनाला ब्रेक लागू नये, यासाठी वाहिन्यांकडून सर्व खबरदारी घेत शूटिंग महाराष्ट्राबाहेर सुरु ठेवले आहे. 

 

टॅग्स :झी मराठी