Join us

Bigg Boss 17 Finale मध्ये 'ओरी'ची एन्ट्री, स्पर्धकांना करायला लावला रॅम्प वॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 19:27 IST

बॉलिवूड स्टारकिड्समुळे प्रसिद्धीझोतात आलेला सोशल मीडिया स्टार 'ओरी' नुकताच बिग बॉस फिनालेमध्ये पोहोचला.

Bigg Boss 17 Finale: बिग बॉस 17 ग्रँड फिनालेला धमाकेदार सुरुवात झाली आहे. सर्व एक्स स्पर्धक फिनालेला हजर झाले आहेत आणि बिग बॉसच्या घरात सध्या धमाल सुरु आहे. सहा तास चालणाऱ्या या फिनालेमध्ये क्रिश्ना अभिषेक आणि भारती सिंह या कॉमेडियन्सने रंगत आणली आहे. तर आता सोशल मीडिया स्टार 'ओरी' (Orry)चीही एन्ट्री झाली आहे. ओरीने सर्व स्पर्धकांचं मनोरंजन करत घरात हलकंफुलकं वातावरण तयार केल्याचं पाहायला मिळत आहे.

बॉलिवूड स्टारकिड्समुळे प्रसिद्धीझोतात आलेला सोशल मीडिया स्टार 'ओरी' नुकताच बिग बॉस फिनालेमध्ये पोहोचला आहे. त्याने सर्व स्पर्धकांना रॅम्प वॉक करण्याचा टास्क दिला. तसंच ज्याचा वॉक जास्त आवडेल त्या तीन स्पर्धकांना ओरीसोबत सेल्फी घेता येणार आहे. दरम्यान सर्वच स्पर्धक आपापल्या खास शैलीत रॅम्प वॉक करतात. समर्थ जुरैल यावेळी ईशा मालवीयसोबत रॅम्प वॉक करतो. त्याच्या रॅम्प वॉकवर सर्वच हसतात. 

सर्वांचं रॅम्प वॉक पाहिल्यानंतर ओरी विजेत्यांची नां जाहीर करतो. समर्थ, नील आणि अंकिता यांच्यासोबत ओरी सेल्फी घेतो. ओरीच्या येण्याने घरातलं वातावरण एकदम हलकंफुलकं होऊन जातं.  बिग बॉस च्या घरात ओरीही एक दिवस राहिला होता. तो त्या दिवसाच्या आठवणीही जाग्या करतो. नंतर ओरी सर्वांना शुभेच्छा देऊन घरातून बाहेर पडतो. 

'या ' दोन स्पर्धकांनी फिनालेकडे फिरवली पाठ

तीन महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या बिग बॉस १७ मध्ये एकूण 20 स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये अंकिता लोखंडे-विकी जैन आणि नील-ऐश्वर्या या दोन जोड्या आल्या. शिवाय ईशा मालवीय, अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, आयेशा खान, समर्थ जुरैल, मन्नारा चोप्रा, अनुराग डोबाल, सना खान,अरुण माशेट्टी, सनी आर्या, खानजादी, जिग्ना वोरा, रिंकू धवन, सोनिया बन्सल आणि नाविद सोल या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश घेतला होता. या स्पर्धकांमधून दोन स्पर्धक फिनालेला आलेले नाहीत. ते म्हणजे अनुराग डोभाल (Anurag Dobhal) आणि खानजादी (Khanzadi). 

टॅग्स :बिग बॉससोशल मीडियाटेलिव्हिजन