Join us

"हा इथे काय करतोय?", ओंकार भोजनेच्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील एन्ट्रीवर वनिता खरातची पोस्ट

By कोमल खांबे | Updated: October 14, 2025 14:30 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकारची एन्ट्री झाल्यावर अभिनेत्री वनिता खरातने खास पोस्ट शेअर केली आहे. वनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ओंकार भोजनेसोबतचा सेटवरील एक फोटो शेअर केला आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टेलिव्हिजनवरील अतिशय लाडका आणि लोकप्रिय शो आहे. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकारांना त्यांचं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली. या विनोदी शोमुळे अभिनेता ओंकार भोजनेदेखील घराघरात पोहोचला. ओंकारने अभिनय आणि कॉमेडीच्या टॅलेंटच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. मात्र त्याने अचानकच मध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला रामराम करत वेगळी वाट निवडली होती. आता पुन्हा एकदा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकारची एन्ट्री झाली आहे. 

ओंकार भोजने पुन्हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये दिसणार असल्याने चाहते उत्सुक आहेत. त्याचा पहिला प्रोमोही समोर आला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकारची एन्ट्री झाल्यावर अभिनेत्री वनिता खरातने खास पोस्ट शेअर केली आहे. वनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ओंकार भोजनेसोबतचा सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला वनिताने खास कॅप्शनही दिलं आहे. "मामा मामी is back...हा इथं काय करतोय... बघायला विसरू नका. तुमच्या टेन्शन वरची मात्रा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'...", असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. 

ओंकार भोजने आणि वनिता खरातचं एकत्रित स्किट प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरलं होतं. आता पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून पाहायला मिळणार आहे.  'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये आता ओंकारचे नवीन कोणते स्किट पाहायला मिळणार, याबाबतही चाहते उत्सुक आहेत.   

English
हिंदी सारांश
Web Title : Onkar Bhojane returns to 'Maharashtrachi Hasyajatra'; Vanita Kharat shares post.

Web Summary : Onkar Bhojane's comeback to 'Maharashtrachi Hasyajatra' excites fans. Vanita Kharat shared a photo, captioning, 'Mama Mami is back'. The pair's skits were previously very popular.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार