Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG ! ​मेकअपने बिघडवला या अभिनेत्रीचा चेहरा, ओळखणेही झाले कठीण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 14:49 IST

‘स्वरागिनी’ आणि ‘देवांशी’ सारख्या लोकप्रीय टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री हेली शाह हिला सध्या तुम्ही ओळखूचं ...

‘स्वरागिनी’ आणि ‘देवांशी’ सारख्या लोकप्रीय टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री हेली शाह हिला सध्या तुम्ही ओळखूचं शकणार नाही. हेलीचा एक फोटो सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होतो आहे. हा फोटो पाहून हेलीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो. फोटो पाहता, हेलीच्या चेहºयावर कसले तरी इंफेक्शन झाले असावे, असे वाटू शकते. पण असे काहीही नाही. होय, तुम्ही वेगळा काही तर्क काढण्याआधी आम्हीचं या फोटोमागचे गुपित तुम्हाला सांगू इच्छितो. 



हेलीचा हा ताजा फोटो तिच्या एका शोच्या सेटवरचा आहे. या शोमध्ये हेलीला एका गरिब मुलीचा लूक द्यायचा होता. पण चेहºयावर ‘गरिबी’ दाखवण्याच्या नादात हेलीचा इतका मेकअप केला गेला की, ती गरिब कमी अन् भयावह अधिक दिसू लागली. गरिब मुलीचा परफेक्ट लूक देण्याच्या नादात मेकअप इतके गडद झाले की हेलीच्या चेहºयाचे अक्षरश: बारा वाजलेत. आता तिने कुठल्या शोसाठी हा लूक स्वीकारला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण लवकरच तेही स्पष्ट होईल.
खरे तर आव्हानात्मक भूमिकांसाठी कलाकार स्वत:वर कुठलेही प्रयोग करून घ्यायला तयार असतात. पण हेलीच्या या मेकअपला प्रयोग म्हणावे का, हाच खरा प्रश्न आहे.
‘स्वरागिनी’ या मालिकेने हेलीला नवी ओळख दिली. या मालिकेत तिने स्वराची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीत उतरली होती. ‘गुलाल’ या शोद्वारे हेलीने छोट्या पडद्यावरील आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ‘लक्ष्मी- हमारी सुपर बहू’, ‘खेलती है आँख मिचोली’,‘खुशियों का गुल्लक’ अशा अनेक मालिकांत ती दिसली.