Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो...! सध्या शिव ठाकरे या व्यक्तीच्या प्रेमात, पहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 19:15 IST

शिव ठाकरे याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो प्रेम व्यक्त करताना दिसतो आहे.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचा विजेता शिव ठाकरेने या सीझनमधून खूप लोकप्रियता मिळवली. या शोदरम्यान विणा आणि शिवमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले आणि हळूहळू मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. बिग बॉस' जिंकण्यासाठी शिव ठाकरे आणि वीणा जगतापने ड्रामा केला अशीही टीका त्यांच्यावर झाली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करत त्यांनी प्रेमाची जाहीर कबुली दिली. मात्र आता शिव-वीणाच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे शिव मामा झाल्याचा आंनद घेतो आहे आणि आता पुन्हा शिव ठाकरे पडलाय प्रेमात हे त्याने सोशल मीडिया माध्यामातून सांगितले आहे.

शिव ठाकरे याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो आजीसोबत दिसतो आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, बिंदी में तू कितनी सोनी लगदी आजी. तसेच त्याने सर्वांना घरी रहा आणि सुरक्षित रहा असेही सांगितले आहे. या व्हिडीओत शिव आपल्या आजीला बेबी तेरे चेहरेसे नजर नहीं हटती मैं क्या करू... बिंदी मै तू कितनी सोनी लगती असे म्हणताना दिसतो आहे.

शिव व वीणाचे नाते बिग बॉसच्या घरातच फुलले होते. बिग बॉसच्या घरात दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तर चांगलेच बहरले.

यादरम्यान दोघांनी एकमेकांसोबत फोटो व व्हिडीओ शेअर करण्याचा अक्षरश: धडाका लावला होता. दरम्यान आता शिव आणि वीणाचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चांणा उधाण आले होते. मात्र शिव आणि वीणाने होळी एकत्र साजरी करून या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

टॅग्स :शीव ठाकरेवीणा जगताप