Join us

अरेच्चा...! 'संस्कारी सून' संगीता कपुरेचा बोल्ड अंदाज पाहून झालात ना अचंबित, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 07:15 IST

छोट्या पडद्यावर सामान्य व सोज्वळ सूनेच्या अंदाजात पहायला मिळणारी संगीता कपुरे हिने नुकतेच सोशल मीडियावर बोल्ड फोटोज शेअर केले आहेत.

आपल्याला छोट्या पडद्यावर सुंदर साडी, सलवार कुर्तीमध्ये पहायला मिळणाऱ्या अभिनेत्री या त्यांच्या खासगी आयुष्यातदेखील अशाच असतील असे नाही. 

आता छोट्या पडद्यावरील संस्कारी बहू म्हणजेच अभिनेत्री संगीता कपुरे खऱ्या जीवनात खूपच बोल्ड व ग्लॅमरस आहे. 

संगीता खासगी आयुष्यात खूपच स्टाईलिश आहे. तसेच ती निडर आणि सोबतच खूप बोल्ड आहे.

नुकतेच तिचे काही बोल्ड फोटोज पहायला मिळत आहेत. या फोटोत ती खूप सुंदर व हॉट अंदाजाात पहायला मिळत आहेत.

संस्कारी दिसण्यासाठी संस्कारी कपडे घालणे गरजेचे नाही आहे, मी तेच कपडे घालते जे माझ्यासाठी आरामदायक आहे, असे संगीता सांगते.

मी जे पात्र करते आहे ती एक विवाहित सून आहे आणि तिला ते कपडे घालायला आवडतात, असेही ती म्हणाली.

कुबूल है, छोटी बहू, देवो के देव महादेव आणि इतर अनेक मालिकांमध्ये संगीता कपूर दिसली आहे.

त्यांच्या रिल लाईफ सुनेत सोज्वळ व संस्कारी सूनेच्या भूमिकेत पाहिल्यानंतर आता तिच्या रिअल लाईफमधील ग्लॅमरस अवतार पाहून प्रेक्षकांना नक्कीच धक्का बसणार असेल.

सध्या संगीता ये रिश्ते है प्यार के या मालिकेत निधी राजवंश ही भूमिका साकारताना दिसते आहे.