Join us  

शो बंद, लाइमलाइटपासून दूर; आता सामान पॅक करुन कुठे शिफ्ट होतोय कपिल शर्मा?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 11:38 AM

कपिल शर्मा(Kapil Sharma)ने नवीन घर घेतल्याची सध्या चर्चा रंगली आहे. तो दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट होतोय का? असे प्रश्न लोकांना पडले आहेत.

कपिल शर्मा(Kapil Sharma)ने नवीन घर घेतल्याची सध्या चर्चा रंगली आहे. तो दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट होतोय का? हे प्रश्न लोकांच्या मनात आले आहेत. जेव्हा कपिल त्याच्या घराच्या खाली असलेल्या टेम्पोमध्ये सामान चढवताना दिसला. काही डबाबंद माल चढवला जात होता, त्याशिवाय काही फुलांच्या कुंड्याही होत्या. हे पाहून कपिल कुठेतरी शिफ्ट होण्याच्या तयारीत असल्याचं दिसत होतं.

कपिलला पाहताच पापाराझींनी त्याला घेरले आणि त्याचे फोटो क्लिक केले. पण जेव्हा त्याने शिफ्टिंगबद्दल प्रश्न विचारला तेव्हा कपिलने त्याला अजिबात उत्तर दिले नाही. त्याने पापाराझींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आणि मौन बाळगले. मात्र, वारंवार विचारणा केल्यावर लवकरच कळेल, असे त्याने म्हटले. ज्यावरून हे स्पष्ट होते की तो काहीतरी लपवत आहे. पण ते काय आहे ते वेळ आल्यावर कळेल.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावर मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. एका यूजरने लिहिले की, तो सोनी वरून कलर्सवर परत जात आहे, तर काहींना कपिल अॅटिट्यूड दाखवत असल्याचं वाटलं.

कपिल शर्मा शोची वाट पाहताहेत चाहतेलोकप्रिय सेलिब्रिटी चॅट शो द कपिल शर्मा शोला प्रेक्षक खूप मिस करत आहेत. काही काळ शो बंद आहे. परदेशातील लाइव्ह शोमुळे तो बंद झाला होता पण आता तो पुन्हा सुरू व्हावा अशी चाहत्यांची इच्छा आहे. असे झाल्यास त्याचा हा चौथा सीझन असेल. पहिले तीन सीझन जबरदस्त हिट ठरले आहेत. ज्यामध्ये बॉलिवूडचे जवळपास सर्वच सेलिब्रिटी आले आहेत. कपिलचा नुकताच प्रदर्शित झालेला झ्विगेटो सुद्धा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. अशीही बातमी आहे की, कपिल पुन्हा काही नेटफ्लिक्स प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. 

टॅग्स :कपिल शर्मा द कपिल शर्मा शो