Join us  

ना मेकअप, ना महागडे कपडे; अमृता-प्रसादच्या साखरपुड्याचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 6:18 PM

amruta and Prasad engagement photo: या जोडीने कोणताही थाटमाट न करता साधेपणाने साखरपुडा केला.

बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) चौथ्या पर्वातून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे अमृता देशमुख (amruta deshmukh) आणि प्रसाद जवादे (Prasad jawade). बिग बॉसच्या घरात एकमेकांचे चांगले मित्र असलेले हे दोघं लवकरच खऱ्या आयुष्यात एकमेकांचे पार्टनर होणार आहेत. नुकताच या दोघांनी साखरपुडा करत त्यांचं नात ऑफिशिअली जाहीर केलं. विशेष म्हणजे या जोडीने अत्यंत साध्या पद्धतीने साखरपुडा केला आहे.

अमृता आणि प्रसादने गुपचूप पद्धतीने साखरपुडा करत चाहत्यांना धक्का दिला. या जोडीने इन्स्टाग्रामवर थेट दोघांचे अंगठी घातलेले फोटो शेअर केले आणि त्यांचं नातं जगजाहीर केलं. परंतु, हे फोटो पाहिल्यावर चाहत्यांना त्यांचा साखरपुडा कसा झाला, या समारंभाला कोणते सेलिब्रिटी होते, या जोडीने कोणते डिझायनर कपडे परिधान केले होते असे कितीतरी प्रश्न चाहत्यांना पडले होते. मात्र, या जोडीने अत्यंत साधेपणाने साखरपुडा केला. 

प्रसाद-अमृताच्या एका फॅनपेजवर या जोडीचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. याध्ये प्रसाद आणि अमृताने थाटामाटात किंवा अमाप पैसे खर्च करुन अजिबात साखरपुडा केला नाही. त्याऐवजी या दोघांनी आईवडिलांसमोर एकमेकांना अंगठी घालून अत्यंत साधेपणाने साखरपुडा केला. विशेष म्हणजे त्यांनी महागडे कपडे, दागदागिने, मेकअप असं काहीही केलं नाही.  

दरम्यान, सेलिब्रिटी असून या दोघांनी अत्यंत साधेपणाने साखरपुडा केल्यामुळे सध्या त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नुकताच साखरपुडा केल्यानंतर ही जोडी लवकरच लग्नगाठदेखील बांधणार आहे. अमृता-प्रसादनंतर अलिकडेच स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांनीही साखरपुडा केला आहे. त्यामुळे मराठी कलाविश्वात लग्नसराईचे वारे वाहू लागल्याचं म्हटलं जात आहे. 

टॅग्स :अमृता देशमुखसेलिब्रिटीटेलिव्हिजनबिग बॉस मराठी