Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 2 : घरातील 'या' सदस्याच्या जबरा फॅनने केला असा काही कारनामा, वाचून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 14:53 IST

कलाकार आणि त्यांच्या फॅन्सचं एक वेगळच नातं असतं. बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वामधील स्पर्धक शिवानी सुर्वे हिचा एक जबरा फॅन आहे.

कलाकार आणि त्यांच्या फॅन्सचं एक वेगळच नातं असतं. बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वामधील स्पर्धक शिवानी सुर्वे हिचा एक जबरा फॅन आहे. ह्या फॅनने ‘शिवानी स्टाईल’ नावाचा स्टिकर त्याच्या गाडीवर लावला आहे. निनाद म्हात्रे असं ह्या जबरा चाहत्याचं नाव असून, हा रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये राहणारा आहे.

शिवानी सुर्वेच्या या चाहत्याने सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ट्रेंड होत असलेल्या ‘शिवानी स्टाईल’ या हॅशटॅगचा स्टिकर बनवलाय. यावर प्रतिक्रिया देताना तो म्हणतो, “शिवानी मला खूप आवडते. मी तिचा खूप मोठा चाहता आहे. मला तिचा बेध़डक स्वभाव खूप आवडतो. ती बिग बॉसमध्ये खूप छान खेळत आहे. माझ्यासाठी ती बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची विजेती आहे. मी तिच्याप्रेमाखातर शिवानी स्टाइल स्टिकर गाडीवर लावला आहे.'' 

निनाद म्हात्रे शिवानीसाठी सोशल मीडियावर रोज पोस्ट टाकतो. त्याने तिच्यासाठी फॅनपेज देखील बनवले आहे. तिच्या या बिग बॉसच्या प्रवासात तो तिला भक्कम पाठिंबा देतोय. तो म्हणतो, “आम्हा चाहत्यांचा एक इन्स्टावर ग्रुप आहे तसेच व्हॉट्सअरग्रुपही आहे. ज्यामध्ये आम्ही सर्व शिवानीचे चाहते एकत्र आहोत. मी शिवानीला कधी भेटलो नाही. पण आता 1 सप्टेंबरच्या ग्रँडफिनाले एपिसोडनंतर तिला भेटून तिच्यासोबत एक फोटो काढायची आणि ऑटोग्राफ घेण्याचीही इच्छा आहे.”  

शिवानी सुर्वे हिने मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्ये अभिनेय केला आहे. तिची हिंदी टेलिव्हिजन मालिका ‘जाना ना दिल से दूर’ इंडोनेशियामध्ये सध्या टेलिकास्ट होत असल्याने शिवानीचे जगभरामध्ये फॅन्स आहेत. काही काळापूर्वी तिने गुगल सर्चमध्ये महेश मांजरेकरांनाही मागे टाकले होते.

टॅग्स :शिवानी सुर्वेबिग बॉस मराठी