Join us

निया शर्माचा Sexy Look व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2017 17:18 IST

निया शर्मा नेहमीच तिच्या सेक्सी लूकमुळे चर्चेत असते.जिथे जाते तिथे मीडियाचे कॅमेरे नियाकडे वळले नाही तरच नवल.तिचा सेक्सी आणि ...

निया शर्मा नेहमीच तिच्या सेक्सी लूकमुळे चर्चेत असते.जिथे जाते तिथे मीडियाचे कॅमेरे नियाकडे वळले नाही तरच नवल.तिचा सेक्सी आणि बोल्ड अंदाज नेहमीच सा-यासाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. निया शर्मा सध्या 'खतरों के खिलाडी'च्या 8 व्या सिझनमध्ये बिझी आहे.तिला शूटिंगच्या वेळेत जसा वेळ मिळेल तसे ती अनेक ठिकाणांना भेट देत आपले खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.मात्र आता नियाने शेअर केलेला फोटोत दिसणा-या रम्य स्थळांपेक्षा फोटोत दिसणारा तिचा सेक्सी,ग्लॅमरस लूकचं जास्त लक्ष वेधून घेत आहे.डिसेंबर 2016 मध्ये निया शर्माला एशियाची तिसरी सेक्सी महिला हा किताब मिळाला होता.एका अवॉर्डशोमध्ये निया अतिशय सेक्सी लूकमध्ये रेड कार्पेटवरअवतरली होती.या अवॉर्डशोमध्ये नियाने परिधान केलेला ड्रेसिंग स्टाइलमुळेच  ती अधिक हॉट दिसत होती. याच लूकमध्ये या अवॉर्डशोमध्ये पोहोचल्यानंतर निया जास्त प्रकाशझोतात आली.निया शर्मा तिच्या सेक्सी ड्रेसिंगमुळेच सेक्सी वुमेन इन एशिया ठरली होती. निया नेहमी तिच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो  सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर करत असते.ती सतत अॅक्टीव्ह असल्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येतही वाढ होत आहे.सध्या 'खतरों के खिलाडी 8' या रिअॅलिटी शोमध्ये ती असल्यामुळे या शोमध्ये तिचा बोल्डनेस तर रसिकांना पाहायला मिळेलच त्याचबरोबर तिचा बेधडक अंदाज पाहणेेही रसिकांना औत्सुक्याचे ठरणार आहे.हा शो संपल्यानंतर निया शर्मा टीव्ही जगतातील सर्वाधिक वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणारा ‘बिग बॉस’ या शोमध्येही सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.