Join us

'जीव झाला येडापिसा'मध्ये येणार रंजक वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 15:46 IST

शिवा आणि सिध्दीचे नाते कोणते वळण घेईल ? सोनला त्यांच्या नात्याबद्दल कळेल ?

गेल्या आठवड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना महापुराने वेठीस धरले... महापुरामुळे तेथे हाहाकार उडाला, जनजीवन देखील विस्कळीत झाले.आता मात्र हे जिल्हे पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यासाठी तसा प्रयत्न देखील सुरू आहे. सांगलीमध्ये कलर्स मराठीवरील “जीव झाला येडापिसा” या मालिकेचे देखील चित्रीकरण सुरू आहे, येथील परिस्थितिमुळे शूटिंग थांबावावे लागले. परंतु मालिकेचे कलाकार आणि संपूर्ण युनिट सुरक्षित जागी होते.

गेल्या आठवड्यातील पूरस्थिती लक्षात घेता चित्रीकरण होऊ शकले नाही, आणि या आठवड्यामध्ये काही भागांचे पुन:प्रक्षेपण करण्यात आले. पंरतू येत्या सोमवारपासून म्हणेजच १९ ऑगस्टपासून मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. आपले आवडते कलाकार सिध्दी – शिवा परत येत आहेत मालिकांच्या नव्या भागांसोबत, नव्या घटना घेऊन... शिवा आणि सिध्दीचे नाते कोणते वळण घेईल ? सोनला त्यांच्या नात्याबद्दल कळेल ? सोनलच्या शिक्षणाची जबाबदारी पुन्हा सिध्दी घेईल की सिध्दीच्या सांगण्यावरुन शिवा सोनलसाठी दुसरा शिक्षक आणेल ? शिवाच्या चांगले वागणयामागचे कारण सिद्धीला कळेल ?

हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत... प्रेक्षकांनी आजवर मालिकेवर आणि कलाकारांवर भरभरून प्रेम केले आणि आतासुध्दा तसेच प्रेम देतील हीच इच्छा.

टॅग्स :कलर्स मराठी