Join us

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये नवीन ट्विस्ट, सौमित्रला लग्नासाठी राधिका देणार होकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 17:44 IST

अनिता दातेने शेअर केलेल्या 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील व्हिडिओत राधिका सौमित्रला होकार देत असल्याचं पहायला मिळतंय.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' टीआरपीच्या शर्यतीत नेहमी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असते. या मालिकेतील शनाया व गॅरीची जोडी जितकी चर्चेत असते तितकीच राधिका व सौमित्रची मैत्रीदेखील रसिकांना भावते आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे.

मालिकेत सौमित्र सर्वांना सोडून परदेशात कायमचा निघून जाणार असतो. त्याचा हा निर्णय ऐकून राधिकाला धक्का बसतो. सौमित्रला निरोप देण्यासाठी गुलमोहर सोसायटीमधील सर्वजण एकत्र येतात. सौमित्रने त्याचा निर्णय राधिकाला अचानक सांगितल्यामुळे राधिकाचं मन दुखावलं जातं. दरम्यान सौमित्र सर्वांसमोर त्याचे राधिकावर प्रेम असल्याचं सांगतो. ते ऐकून राधिकाला धक्काच बसतो आणि ती सौमित्रकडे या गोष्टीचा विचार करण्यासाठी वेळ मागते. सौमित्र राधिकाला २४ तासांचा कालावधी देतो.

आजच्या भागामध्ये राधिका सौमित्रला होकार देणार की गुरुनाथच्या भीतीने नकार देणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. खुद्द राधिका म्हणजेच अनिता दाते हिनं राधिका सौमित्रला होकार देत असल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राधिका सौमित्रला होकार देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

राधिकाच्या या निर्णयाकडे प्रेक्षक व गुरूनाथ काय प्रतिक्रिया देईल, हे पाहणं कमालीचं ठरणार आहे.

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायकोझी मराठी