Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदित्यने सईला घराबाहेर काढलं, माझा होशिल ना मालिकेला धक्कादायक वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 18:20 IST

आदित्यने रागाच्या भरात आता सईलाच घराबाहेर काढले आहे. यामुळे सई अक्षरश: कोलमडून गेली आहे.

ठळक मुद्देआता वेगळा संसार म्हटला की, ताण-तणाव हे आलेच. आदित्य नवीन जॉबच्या शोधात आहे. पण त्याला अजून काही जॉब मिळत नाहीये.

माझा होशील ना या सिरीयलला एक धक्कादायक वळण मिळणार आहे. आदित्यने रागाच्या भरात आता सईलाच घराबाहेर काढले आहे. यामुळे सई अक्षरश: कोलमडून गेली आहे. 

सई आणि आदित्य यांनी मामांपासून वेगळे होऊन स्वत:चा वेगळा संसार मांडला आहे. भाड्याच्या घरात ते आता राहायला लागले आहेत. आता वेगळा संसार म्हटला की, ताण-तणाव हे आलेच. आदित्य नवीन जॉबच्या शोधात आहे. पण त्याला अजून काही जॉब मिळत नाहीये. तर दुसरीकडे घर चालवायला सईला पैशांची चणचण भासत आहे. त्यामुळे ती दुकानातून उधारीवर सामान आणते आणि जेव्हा आदित्याला हे कळतं, तेव्हा दोघांमध्ये कडाक्याचं भांडण होतं आणि रागाच्या भरात आदित्य सईला घराबाहेर काढतो.  

खरंतर मामांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेणं सई आणि आदित्यासाठी काही सोपे नव्हते. मालिकेत अलीकडेच बंधू मामांनी १४ वर्षांपूर्वी लग्न केलं असल्याचं घरातल्यांसमोर उघड झालं होतं. बंधूमामांनी लग्न केलं असल्याचं उघड होताच घरात अनेक वाद निर्माण झाले आहेत आणि याची झळ सई आणि आदित्यला बसली आहे. यामुळेच त्या दोघांनी आता घरातून बाहेर पडून वेगळा संसार मांडला आहे. आता वेगळा संसार मांडला की रोजच्या कटकटी, कुरबुरी हे सारं काही आलंच आणि आता त्याचाच सामना सई आणि आदित्यला करावा लागतोय.

टॅग्स :झी मराठी