Join us

कारभारी लयभारी या मालिकेला मिळणार हे वळण, फॅन्स होणार खूश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 19:08 IST

कारभारी लयभारी या मालिकेच्या कथानकाला आता नुकतेच वळण मिळणार असून हे वळण या मालिकेच्या चाहत्यांना आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.

ठळक मुद्देआता तर वीरू पियुला प्रपोज करायचं ठरवणार असून खूप प्रयत्नांती तो प्रियांकाला प्रपोज देखील करणार आहे.

कारभारी लयभारी ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांची खूपच चांगली पसंती मिळत आहे. या मालिकेची कथा, मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावत आहेत. तसेच या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाचे देखील कौतुक होत आहे. या मालिकेच्या कथानकाला आता नुकतेच वळण मिळणार असून हे वळण या मालिकेच्या चाहत्यांना आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.

राजकारणावर बेतलेली कारभारी लयभारी मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे, सूर्यवंशी आणि पाटील ही दोन राजकीय घराणी आणि त्यांच्यात असलेले राजकीय वैर हे सर्वज्ञात आहे. पियूने आपणच विरोधी पक्षातल्या अंकुशराव पाटलाची मुलगी आहोत ही तिची खरी ओळख वीरू पासून दडवून ठेवली होती.

पियूकडून घडलेल्या एका नकळत कृतीपायी राजवीर अडचणीत आला होता. त्यामुळे राजवीर आणि पियू मध्ये खटके उडत होते, पण आता त्यांची मैत्री झालेय, वीरू ला पियूच्या वागण्याबोलण्यातून तिला तो आवडत असल्याचं प्रेक्षकांना कळत आहे. आता तर वीरू पियुला प्रपोज करायचं ठरवणार असून खूप प्रयत्नांती तो प्रियांकाला प्रपोज देखील करणार आहे.

आता ह्यावर पियूचं उत्तर काय असेल, ती सुद्धा या प्रेमाला होकार देईल की आपले वडील अंकुशराव पाटील ह्यांना घाबरून राजवीरला कायमचं विसरेल या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना या कारभारी लयभारी या मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहेत. 

टॅग्स :झी मराठी