'सरस्वती' मालिकेला नवीन वळण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 17:45 IST
'सरस्वती' मालिकेमध्ये बऱ्याच दिवसांपासून अनपेक्षित घटना घडत आहेत.सरस्वतीचा खून होणे,राघवचे दुर्गालाच सरस्वती समजणे, देविकाचे अचानक वाडा सोडून जाणे, या ...
'सरस्वती' मालिकेला नवीन वळण!
'सरस्वती' मालिकेमध्ये बऱ्याच दिवसांपासून अनपेक्षित घटना घडत आहेत.सरस्वतीचा खून होणे,राघवचे दुर्गालाच सरस्वती समजणे, देविकाचे अचानक वाडा सोडून जाणे, या सगळ्या घटनांमुळे मालिकेला नक्कीच वेगळी कलाटणी मिळाली. विद्युलने आजवर भुजंगच्या मदतीने रचलेली सगळी षड्यंत्र यशस्वी झाली. पण, दुर्गाच्या बेधडक आणि बिनधास्त स्वभाव विद्युलवर भारी पडला.तिच्या प्रत्येक कारस्थानांना,चालींना दुर्गाने उलटून लावले. या सगळ्या घटनांमध्ये प्रेक्षकांना आता अजून एक सरप्राईझ आहे. त्यांची लाडकी सरस्वती,मोठ्या मालकांची सरू मालिकेमध्ये परतणार आहे. सरस्वतीच्या परतण्याने आता मालिकेमध्ये कोणते नवे वळण मिळणार आहे? राघव आणि सरस्वती पुन्हा एकत्र येणार का ? विद्युल कोणती नवी खेळी खेळणार ? दुर्गा सरस्वती आणि राघव यांना एकत्र येऊ देईल ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 'सरस्वती' मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये रसिकांना मिळणार आहेत.(Also Read:सरस्वती मालिकेच्या सेटवरील सरू आणि देविकाची ऑफ स्क्रीन धम्माल!) भैरवकर वाड्यावर बऱ्याच गोष्टी घडत असतानाच,देविका वाडा सोडून गेली.विद्युल आणि भुजंग यांना वाड्याच्या कागदपत्रांवर दुर्गाची स्वाक्षरी हवी असल्याने या दोघांनी दुर्गाला भैरवकर वाड्यावर आणले.याचदरम्यान,दुर्गाला सरस्वतीबद्दल सगळी माहिती हळूहळू मिळू लागली. सरस्वती कशी होती,तिचा स्वभाव कसा होता,तिचं आणि राघवचं नातं कसं होतं हे सगळं दुर्गाला कळत.त्याचबरोबर दुर्गाला विद्युल आणि भुजंग यांच्या कारस्थानाबद्दल देखील सुगावा लागतो.ती या दोघांच्या कुठल्याही म्हणण्यामध्ये येत नाही,कुठलही कामं ऐकत नाही आणि यामुळेच भुजंग आणि विद्युल तिला मारण्याचा कट रचतात. हे सुरु असतानाच वाड्यावर दुर्गाच्या अक्का येतात.आता अक्का आणि दुर्गा मिळून वाड्यामध्ये काय करतील? कसा विद्युल आणि भुजंग यांचा कट उधळून लावतील हे बघण्यासारखे असणार आहे. मालिकेमध्ये इतक्या घटना घडत असताना राघवची सरू परतणार आहे.सरस्वती एका वेगळ्याच रुपात मालिकेमध्ये परतणार आहे.'सरस्वती' आता एका नव्या कुटुंबासोबत रहात आहे.त्या घरामध्ये एक छकुली आहे,तिचे वडील आहेत.या लहान छकुलीची भूमिका गार्गी जोशी साकारणार आहे. सरस्वती मालिकेमध्ये परतण्याने काय घडेल? या नव्या घरामध्ये ती कशी पोहचली? तिला कोणी वाचवलं?'सरस्वती' बरोबर या काही महिन्यांमध्ये काय घडलं? दुर्गा आणि सरस्वती एकच आहेत का? राघव आणि सरस्वती पुन्हा एकत्र येतील का? मालिकेला कुठलं नवं वळण मिळेल? हे पाहणे रंजक ठरणार आहे.