Join us

सायली संजीवच्या घरी झालं चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; फोटो पाहून तुम्ही पडाल त्याच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 13:20 IST

 सायली संजीव (Sayali sanjeev)ने करिअरची सुरूवात मॉडेलिंग क्षेत्रातून केली आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सायलीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.

 सायली संजीव (Sayali sanjeev)ने करिअरची सुरूवात मॉडेलिंग क्षेत्रातून केली आहे. त्यानंतर, तिने ‘पोलीस लाइन्स – एक पूर्ण सत्य’, आटपाडी नाईट्स, मन फकिरा, एबी अँड सीडी आणि द स्टोरी ऑफ पैठणी, झिम्मा या चित्रपटातही काम केले. तिने ‘काहे दिया परदेस’,‘परफेक्ट पाटी’, ‘गुलमोहर’ आणि ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकेत काम केले आहे. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या सायलीच्या घरी नुकत्याच एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.याविषयी फोटो शेअर करुन तिने माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सायलीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये तिच्या घरी आलेल्या एका नव्या पाहुण्याची ओळख तिने चाहत्यांना करुन दिली आहे. सायली संजीवने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती काही क्युट अशा डॉगीजच्या पिल्लूसोबत दिसून येत आहे. अभिनेत्रीच्या घरात या गोंडस पाहुण्यांचं आगमन झालं आहे.  घरात आलेल्या या पाहुण्यांमुळे अभिनेत्री फारच आनंदी आहे. तिचा आनंद गगनात मावत नाहीय.सायलीच्या चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. 

काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ या सुपरहिट चित्रपटातही ती दिसली. गेल्या बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटर ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव यांच्या अफेयर्सची चर्चा रंगताना दिसते आहे. दोघांच्या सोशल मीडियावरील अ‍ॅक्टिव्हिटीवरून चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, याबाबत त्या दोघांनी मौन बाळगलं आहे. 

टॅग्स :सायली संजीव