Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून नेहाने घेतला ब्रेक?, यामागील कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 12:36 IST

'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सुरु झाल्यापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतून ब्रेक घेऊन नेहा लंडनला पोहोचलीय.

'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सुरु झाल्यापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच श्रेयस तळपदे (shreyas talpade) आणि प्रार्थना बेहरे (prarthana behere) ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळाली. उत्तम कथानकासह कलाकारांच्या अभिनयामुळे लोकप्रिय झालेल्या या मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट येत आहेत.  सध्या मालिकेत सिमीची कारस्थान,नेहा-यशचं प्रेम, दुसरीकडे समीर-शेफालीची नव्यानं सुरु झालेली लव्हस्टोरी अशा अनेक गोष्टी घडतायेत...असं असतानाच अभिनेत्री प्रार्थना बेहरे मालिकेतील ब्रेक घेवून लंडनला पोहचलीये...आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रार्थनाने मालिकेतून असा अचानक ब्रेक का घेतला. 

तर त्याचं उत्तर आहे तिची बेस्टी सोनाली कुलकर्णीचं लग्न..सोनालीचं लग्न तोंडावर आलय...मेहंदीचा कार्यक्रम नुकताच झाला. असे असताना तिची बेस्टी प्रार्थना लग्नाला कशी जाणार नाही. यासाठी प्रार्थनाने मालिकेतून ब्रेक घेतलाय.

पण याचा अर्थ प्रार्थनाना मालिकेत दिसणार नाही असा नाही. कारण प्रार्थनाने पुढचं शुटिंग आधीच पूर्ण केलंय. तर मग प्रार्थनासह सोनालीच्या सगळ्या मैत्रीणी तर लंडनला पोहोचलीय. लग्नाच्या पहिल्या अॅनिव्हर्सीला सोनाली तिचा पती कुनालसोबतच धुमधडाक्यात पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणारेय. सोनालीच्या लग्नसोहळ्या च्या लगबगीला  सुरुवात झाली असून  नुकतेच तिच्या मेहंदी सेरेमनीचे काही फोटोज समोर आलेत. 

टॅग्स :प्रार्थना बेहरे