Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कोहिनूर तो यूं ही बदनाम है असली हीरा तो आप हो..' नेहा पेंडसेच्या साडीतील अदा पाहून चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 20:02 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे (Nehha Pendse) सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे (Nehha Pendse) सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. सध्या ती लोकप्रिय मालिका 'भाबीजी घर पर हैं'मध्ये अनिता भाभीची भूमिका साकारताना दिसत आहे. नुकताच नेहा पेंडसेने स्वतःचे साडीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नेहा पेंडसेच्या साडीतल्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. गुलाबी रंगाच्या या साडीत ती खूप सुंदर दिसते आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ब्युटीफुल, कोहिनूर तो यूं ही बदनाम है असली हीरा तो आप हो, स्वर्ग सुंदरी-लावण्यवती अशा कमेंट्स नेहाच्या या फोटोवर चाहत्यांनी केल्याच आहेत. 

अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेइंडस्ट्रीत काम केले आहे. 'बिग बॉस १२' मध्ये ही नेहा दिसली होती. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नेहाने मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर हिंदी मालिका ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. याशिवाय नटसम्राट सारख्या यशस्वी मराठी सिनेमांमध्येही तिने काम केले आहे.

 

टॅग्स :नेहा पेंडसे