Join us  

​नक्कश अझीझ कुल्फीकुमार बाजेवाला या मालिकेसाठी करणार गायन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 9:51 AM

टीव्हीवरील एकमेव संगीतमय मालिका असलेली ‘स्टार प्लस’वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ ही मालिका वैशिष्ट्यपूर्ण कथानक आणि उत्कृष्ट कलाकारांमुळे प्रेक्षकांचे लक्ष स्वत:कडे ...

टीव्हीवरील एकमेव संगीतमय मालिका असलेली ‘स्टार प्लस’वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ ही मालिका वैशिष्ट्यपूर्ण कथानक आणि उत्कृष्ट कलाकारांमुळे प्रेक्षकांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत लवकरच बुलेया, मस्त कलंदर यासारखी काही जुनी लोकप्रिय गाणी नव्या सुरेल चालींवर रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. सिकंदर या रॉकस्टारच्या भूमिकेद्वारे नामवंत अभिनेता मोहित मलिक तब्बल तीन वर्षांनंतर टीव्हीच्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. रॉकस्टार असल्याने तो लाइव्ह संगीत कार्यक्रमात गाताना दिसेल. त्यामुळे त्याच्यासाठी अनेक गाणी रेकॉर्ड केली जात आहेत. सिकंदरच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध पार्श्वगायक आणि संगीतकार नक्कश अझीझ पार्श्वगायन करणार आहे. नक्क्सने आतापर्यंत ए. आर. रहमान यांच्याबरोबर ‘रांजणा’ चित्रपटासाठी काम केले असून शिवाय त्याने दिल्ली 6, रॉकस्टार, हायवे या चित्रपटांसाठीही काम केले होते. आता ‘कुल्फीकुमार बाजेवाला’द्वारे तो प्रथमच टीव्हीसाठी काम करणार आहे. त्याने या मालिकेसाठी नुकतेच बुलेया गाण्याचे ध्वनिमुद्रण केले असून त्याचा हा अनुभव खूपच चांगला होता. तो सांगतो, “या मालिकेचे संगीत हे मनापासून रचले गेले आहे. त्याचे संगीत दिग्दर्शन करताना खूप मजा आली.”मोहित मलिकच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. तो देखील सध्या गाणे शिकत असून तो आपल्या भूमिकेसाठी गाणे गाऊ शकतो. या मालिकेत पठाणकोटजवळील मत्सुआ गावातील एका सात वर्षांच्या मुलीची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत असून या कुल्फीला अत्यंत सुरेल आणि गोड गळ्याची तिला देणगी लाभलेली आहे. कुल्फी ही आपल्या गोड आवाजाने निराश किंवा दु:खी प्रसंगाचे रूपांतर नेहमीच आनंद आणि सकारात्मक वातावरणात करते. कुल्फी ही अतिशय आनंदी, स्वच्छंदी, मिश्किल आणि निरागस स्वभावाची, सदा हसतमुख असणारी मुलगी आहे. आपल्या आवडत्या सलवार-कुर्ता, स्पोर्टस शूज आणि केसांची छानशी बांधलेली पोनी टेल अशा अवतारात कुल्फी आपल्या गावातील गल्लीबोळांतून नव्या गोष्टींचा शोध घेत फिरताना दिसते. Also Read : कुल्फीकुमार बाजेवाला फेम आकृती शर्माला भेटायचे आहे माधुरी दीक्षित आणि हेमा मालिनीला