Join us

'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्री आहे व्यवसायिका; प्राण्यांसाठी चालवते खास पेट ग्रुमिंग सलून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 17:17 IST

Vallari Viraj: या अभिनेत्रीच्या पेट ग्रुमिंग सलूनमध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या पाळीव प्राण्यांना घेऊन येत असतात.

मराठी कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत जे अभिनयासह अन्य क्षेत्रांमध्येही नशीब आजमावत आहेत. त्यामुळेच अनेक कलाकारांचा स्वत:चा व्यवसाय वा लहानमोठे उद्योगधंदे आहेत. यामध्येच मराठी अभिनेत्री सुद्घा मागे नाहीत. अनेक लोकप्रिय अभिनेत्रींचे स्वत:चे ब्रँड आहेत. अभिज्ञा भावे, तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, निवेदिता सराफ यांसारख्या अनेक अभिनेत्री अन्य क्षेत्रांमध्ये यशस्वी कामगिरी करत आहेत. यामध्येच आता नवरी मिळे हिटरला या आगामी  मालिकेतील एका अभिनेत्रीचादेखील स्वत:चा एक लहानसा व्यवसाय आहे. तिचं स्वत:चं पेट ग्रुमिंग सलून आहे.

छोट्या पडद्यावर लवकरच नवरी मिळे हिटलरला ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेता राकेश बापट मुख्य भूमिका साकारणार असून त्याच्यासोबत अभिनेत्री वल्लरी विराज ही स्क्रीन शेअर करत आहे. विशेष म्हणजे वल्लरी अभिनेत्री असण्यासोबतच एक व्यावसायिकादेखील आहे. तिचं पेट ग्रुमिंगचं सलून असून तिच्याकडे अनेक सेलिब्रिटी त्यांच्या पाळीव प्राण्यांना घेऊन येतात. 

Bath and Barks असं वल्लरीच्या पेट ग्रुमिंग सलूनचं नाव आहे. तिचं हे सलून दादरमधील गोखले रोड येथे आहे. अलिकडेच या सलूनला अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी भेट दिली होती. त्या त्यांच्या मांजरीला येथे ग्रुमिंगसाठी घेऊन आल्या होत्या.

दरम्यान, वल्लरी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकांमध्ये काम केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेत तिने पार्वतीबाईंची भूमिका साकारली होती. तसंच कन्नी या आगामी सिनेमातही ती झळकणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसिनेमा