झी मराठी वाहिनीवरील ‘नवा गडी नवा राज्य’ (Nava Gadi Nava Rajya) या मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत आनंदी आणि राघवची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. तसेच रमाने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे.
नुकतेच आपण पाहिले कशाप्रकारे मकरसंक्रांतीच्या दिवशी रमा आनंदीवर संक्रांत आणते. रमा आनंदीला खोटा फोन करून आबांची तब्बेत ठीक नाही असं सांगते. आनंदी गावाला जायला निघते. गाडीत असताना आबांचा आनंदीला फोन येतो. आबांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे कळताच आनंदीला आनंद होतो आणि धक्का ही बसतो.
कारण घरी आल्यावर आनंदीला कळत की या सगळ्यात रामाचा हात आहे. आनंदी रमाला चांगलाच जाब विचारणार आहे. इकडे राघव वर्षाला सांगतो की त्याचं आनंदीवर खूप प्रेम आहे, पण ही गोष्ट राघव आनंदीला सांगू शकेल का? तर दुसरीकडे रमाला आनंदी आणि राघवला एकत्र येऊ द्यायचे नाही, त्यासाठी वेगवेगळे डावपेच आखत आहे. अशा परिस्थितीत राघव आनंदीला त्याच्या मनातील भावना सांगू शकेल का, हे पाहणे प्रेक्षकासाठी औत्सुक्याचे असणार आहे. 'नवा गडी नवा राज्य' सोमवार ते शनिवार रात्री ९:०० वा. फक्त आपल्या झी मराठीवर पाहायला मिळेल.