Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकता कपूरमुळे या मराठी अभिनेत्रीला अनेक वर्षांनी मिळाले काम, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 15:33 IST

एकेकाळी छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख होती. क्योंकी साँस भी कभी बहू थी, कोई अपना सा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या.

ठळक मुद्देनारायणीने लग्न केल्यानंतर ती अभिनयक्षेत्रापासून दूर गेली. काही वर्षांपासून ती परदेशात राहात आहे. तिने परदेशाचे नागरिकत्व घेतल्याने ती वर्किंग व्हिसावर भारतात काम करत होती.

नारायणी शास्त्रीने छोट्या पडद्यावर एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. एकेकाळी छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख होती. क्योंकी साँस भी कभी बहू थी, कोई अपना सा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. पण गेल्या काही काळापासून ती अभिनयक्षेत्रापासून दूर आहे.

नारायणीने लग्न केल्यानंतर ती अभिनयक्षेत्रापासून दूर गेली. काही वर्षांपासून ती परदेशात राहात आहे. तिने परदेशाचे नागरिकत्व घेतल्याने ती वर्किंग व्हिसावर भारतात काम करत होती. पण या सगळ्यामुळे निर्मात्यांना तिला अधिक पैसे द्यावे लागत होते. पण हे पैसे परवडत नसल्याने अनेक जणांनी तिला काम देणं बंद केलं. तिच्या करियरच्या सुरुवातीला तिने एकता कपूरच्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते. या मालिकेतील तिच्या भूमिकांना पसंती देखील मिळाली होती. त्याचमुळे एकता कपूर तिच्या मदतीसाठी धावून आली होती. तिला एकताने तिच्या गंदी बात या वेबसिरिजमध्ये काम करण्याची संधी दिली होती. 

नारायणी क्योंकी साँस भी कभी बहू थी मालिकेमुळे प्रकाशझोतात आली होती. 'कुसुम', 'पिया का घर', 'नमक हराम', 'रिश्तों का चक्रव्यूह', 'फिर सुबह होगी', 'लाल इश्क' अशा अनेक टीव्ही मालिकेतून रसिकांचे मनोरंजन केले आहे.

विशेष म्हणजे तिच्या प्रोफेशनल करिअरपेक्षा खाजगी आयुष्यावरच जास्त चर्चा रंगली. तिचे खाजगी आयुष्य अनेकदा वादाच्या विळख्यात अडकलेले पाहायला मिळाले. अनुज सक्सेना या बॉयफ्रेंड सोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिचा को-स्टार असलेल्या गौरव चोप्रा सोबत तिचे नाव जोडले गेले होते. गौरव चोप्रा आणि नारायणी शास्त्री या दोघांनी 'पिया का घर', 'घर घर की लक्ष्मी','बेटीयाँ' सारख्या मालिकेत काम केले. मालिकेच्या सेटवरच त्यांच्या मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे प्रेमात रूंपातर झाले. मात्र फार काळ त्यांचे हे नाते टिकले नाही.

टॅग्स :नारायणी शास्त्रीएकता कपूर