Join us
Daily Top 2Weekly Top 5

नकुल माझ्या मोठ्या भावासारखा - पॉल जॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 13:53 IST

शिवांशची भूमिका साकारणारा अभिनेता नकुल मेहता याचे ऑनस्क्रीन  बहिण पॉल जॉनशीही असेच संबंध आहेत.

‘स्टार प्लस’वरील ‘इश्कबाझ- प्यार की एक धिंचाक कहानी’ या मलिकेतील शिवांशसिंह ओबेरॉयने आपल्या भूमिेकेने प्रत्येक तरुणीचे मन जिंकले आहेत. आपली बहीण शिवानी हिच्याबद्दल शिवांशसिंहला असलेले अपरंपार प्रेम ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाची विशेष आवडती बाजू असून तिच्याशी असलेल्या हळुवार नात्याने त्याने सर्वांची मने जिंकली आहेत. शिवांशची भूमिका साकारणारा अभिनेता नकुल मेहता याचे ऑनस्क्रीन  बहिण पॉल जॉनशीही असेच संबंध आहेत.

यासंदर्भात पॉल जॉन म्हणाली, “नकुल आणि माझ्यात अतिशय छान नातं असून तो माझ्याशी मोठ्या भावासारखा वागतो. मालिकेतील माझ्या शिवानीच्या व्यक्तिरेखेचे सर्वजण, विशेषत: शिवांशसिंहला फार कौतुक वाटते. तो तिला कोणीतरी खास व्यक्ती आहे, अशी वागणूक देतो आणि तिच्या मदतीसाठी नेहमी हजर असतो. ऑफस्क्रीनही  नकुल माझी सर्वप्रकारे काळजी घेतो आणि शूटिंगवेळीही तो मला खूप मदत करतो. मला कोणताही सल्ला हवा असेल, तर मी त्याच्याकडेच हक्काने जाते. त्याच्यासारख्या  डाऊन टु अर्थ कलाकाराबरोबर मला एकत्र भूमिका साकारण्याची संधी मिळत असल्यामुळे मी स्वत:ला खूप नशीबवान समजते. आमच्यातील या मनमोकळ्या मैत्रीच्या नात्याचं प्रतिबिंब या भूमिकेतही पडेल आणि प्रेक्षकांना ते पाहायला आवडेल, अशी आशा करते.”