Join us
Daily Top 2Weekly Top 5

"यांना सीमेवर पाठवा" 'नागिन ७' मध्ये नागिणींची देशभक्ती पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 11:19 IST

टेलिव्हिजनवरील सर्वात गाजलेली आणि तितकीच वादग्रस्त ठरलेली मालिका 'नागिन' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

टेलिव्हिजनवरील सर्वात गाजलेली आणि तितकीच वादग्रस्त ठरलेली मालिका 'नागिन' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एकता कपूरच्या 'नागिन ७' (Naagin 7) मधील एका दृश्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या दृश्यात चक्क नागिणी देशप्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. हे पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावून घेतला आहे.

कलर्स टीव्हीवर नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात, नागिणी त्यांच्या मानवी रूपात येत रॉकेट उड्डाणाविरोधात रचलेल्या शत्रू देशाच्या कारवाया उलथवून लावताना दिसतात. त्यानंतर जेव्हा रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण होतं, तेव्हा 'वंदे मातरम'चे संगीत वाजू लागते आणि नागिणी त्या रॉकेटला कडक सॅल्यूट करतात. हे पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत.

सोशल मीडियावर मिम्सचा पूरहे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होताच एक्स (X) आणि इंस्टाग्रामवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. नेटकऱ्यांनी निर्मात्यांच्या कल्पनाशक्तीची जोरदार फिरकी घेतली आहे. एका युझरने लिहिले, "या नागिणींना आता थेट सीमेवरच पाठवा, शत्रूचा नायनाट करतील!". दुसऱ्याने गंमतीने म्हटले, "भारतीय टीव्ही मालिका आणि त्यातील तर्कहीन नाट्य कधीच संपणार नाही". तर एकाने उपरोधिक टोला लगावत लिहिले, "या सर्पांनी तर विज्ञानाचा इतिहासच बदलून टाकला आहे".

'नागिन ७' मध्ये काय आहे ?यावेळी 'नागिन ७' मध्ये 'बिग बॉस' फेम प्रियंका चहर चौधरी मुख्य भूमिकेत आहे. निर्मात्यांच्या दाव्यानुसार, हे पर्व केवळ सूड आणि प्रेमावर आधारित नसून त्यात 'आत्म-शोध' आणि 'न्यायाची' वेगळी कथा मांडण्यात आली आहे. मात्र, सुरुवातीलाच अशा प्रकारच्या विचित्र दृश्यांमुळे मालिकेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकता कपूरची ही मालिका दरवेळेस आपल्या अजब लॉजिक आणि ग्राफिक्समुळे चर्चेत असते, मात्र यावेळी देशभक्तीचा अँगल जोडल्याने हे दृश्य अधिकच 'विचित्र' वाटत असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Naagin 7's patriotic scenes spark meme fest; viewers unimpressed.

Web Summary : Naagin 7's depiction of patriotic snakes saluting a rocket launch has triggered online mockery. Viewers find the scene absurd, sparking memes and jokes about the show's illogical plot and over-the-top patriotism. The show stars Priyanka Chahar Choudhary.
टॅग्स :एकता कपूर